जामखेडकरांनो आपल्या तालुक्यात कोरोनाचे किती सक्रीय रूग्ण आहेत हे तुम्हाला माहित आहे का ? (how many active patients of Corona in jamkhed?)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : मागील वर्षी कोरोना हाॅटस्पाॅटच्या सर्वाधिक तीव्र झळा सोसलेल्या जामखेडमध्ये कोरोनाची दुसरी लाट सक्रीय होऊ नये यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना तोडक्या पडू लागल्या आहेत.  मागील दोन महिने थंडावलेला कोरोना जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा सक्रीय होऊ लागला आहे. (Corona in jamkhed ) सध्या कोरोनाची गती संथ आहे.परंतु कोणत्याही क्षणी कोरोनाचा भडका उडू शकतो अशी स्थिती सध्यातरी दिसत आहे. (Citizens of Jamkhed, do you know how many active patients of Corona are there?

Corona in jamkhed

ऐकिकडे राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. अनेक भागात काही दिवसांचे लाॅकडाऊनही लावले जात आहेत. हे चित्र असतानाच आता कोरोना लसीकरणाचाही टप्पा सुरू झाल्याने ही बाब काहीसा दिलासादायक आहे. मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास कोरोना विरोधातली लढाई सहजतेने जिंकली जाऊ शकते. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांचा जामखेड तालुक्यात बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. (Citizens of Jamkhed, do you know how many active patients of Corona are there? ) (Corona in jamkhed)

रविवारी रात्री जामखेड तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सुनिल बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड शहरातील आरोळे हाॅस्पीटलमध्ये 19 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यात जामखेड 13, आष्टी 03, कर्जत 02 व पाटोदा 01 या रूग्णांचा समावेश आहे. (Corona in jamkhed) कोरोना रूग्णांची होत असलेली वाढ मोठ्या धोक्याची घंटा वाजवणारी ठरू लागली आहे. प्रशासनाने वेळीच सावध न झाल्यास आजची परिस्थिती बिघडायला वेळ लागणार नाही. जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होऊ नये याकरिता नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. मागच्या वर्षीच्या अनुभवातून जनतेने सजग राहणे आवश्यक आहे. अन्यथा जामखेड शहर व तालुक्यात कोरोना पुन्हा वेगाने आपले पाय पसरवले हे मात्र निश्चित. (Citizens of Jamkhed, do you know how many active patients of Corona are there?)