(Astrologer Raghunath Yemul Guruji) खळबळजनक: तुला आमदार मंत्री व्हायचयं असेल तर बायकोवर “हे” ओवाळून टाक

अध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून पुण्यातील उद्योजक पतीचे अघोरी कृत्य

पुणे : 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण कोणत्या ना कोणत्या कारणाने सार्थ ठरवण्याचा आटापिटा पुण्यात रोज घडताना दिसत आहे. असेच एक धक्कादायक प्रकरण पुण्यातून समोर आले आहे. या प्रकरणात एका उद्योजकाला तुला आमदार व मंत्री व्हायचे असेल तर तुझ्या बायकोला मी दिलेले लिंबू ओवाळून टाक;तुझी पिडा कायमची निघून जाईल असे सांगुन बायकोवर लिंबू ओवाळून टाकण्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणात बुवाबाजी करणार्‍या एका उच्चभ्रु अध्यात्मिक गुरूला (Astrologer Raghunath Yemul Guruji) पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, पुण्यातील एका उद्योजकाला आमदार व्हायचे होते. त्यासाठी त्याने पुण्यातील उच्चभ्रू अध्यात्मिक गुरूकडे (Astrologer Raghunath Yemul Guruji) हजेरी लावली होती. या गुरूच्या सांगण्यावरून संबंधित कुटुंबाने २००७ पासुन सुनेचा छळ सुरू केला होता. हा छळ इतका अमानुष होता की तिला सातत्याने सिगारेटचे चटके देणे, बहिरेपणा येईपर्यंत मारहाण करण्याचे प्रकरण घडले होते. सासरचा अमानुष त्रास सहन न झाल्याने उच्चशिक्षित सुनेने पोलिसांत धाव घेत उद्योजक पतीसह कुटूंबातील आठ जणांविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता या छळामागे एका उच्चभ्रु अध्यात्मिक गुरूचा हात असल्याचे समोर आले.चतुःश्रृंगी पोलिसांनी या अध्यात्मिक बुवाला शनिवारी अटक केली आहे. त्याचे नाव रघुनाथ राजराम येंमुल (४८ , रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) (Astrologer Raghunath Yemul Guruji) असे आहे.

 

Astrologer Raghunath Yemul Guruji
Astrologer Raghunath Yemul Guruji

चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात २७ वर्षीय फिर्यादीचा पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६) यांच्यासह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून पती गणेश आणि राजु अंकुश हे फरार झाले आहेत. याबाबत २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल (Astrologer Raghunath Yemul Guruji) याने पती गणेश गायकवाड याला फिर्यादीचा संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर करण्यास भाग पाडल्याचे पुरवणी जबाबात फिर्यादीने नमूद केल्यानंतर येमुल गुरूजीला अटक करण्यात आली..

ध्यानगुरूच्या (Astrologer Raghunath Yemul Guruji) दरबारात पुढारी, अधिकारी आणि सेलिब्रेटी

आध्यामिक गुरु आणि ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूल गुरूजी (Astrologer Raghunath Yemul Guruji) याच्या दरबारात अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, अभिनेते नियमित हजेरी लावत असत. त्यांचा भक्तगणही मोठा आहे. मागील वर्षी अभिनेते संजय दत्त यांनी देखील गुरूजींचे गुणगाण गायिले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट दोघांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केले आहे.

‘या’ कारणामुळे “ध्यानगुरू” आला अडचणीत

पुण्याच्या औंधमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेचे पायगुण चांगले नाहीत,ती अवदसा असुन पांढर्‍या पाय गुणांची आहे. तीची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दुषीत झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणु अशी कायम राहीली तर तु आमदार व मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्या काढुन घे, मी देतो ते लिंबु उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघुन जाईल, असे अघोरी कृत्य करायला उद्योजक असलेल्या गणेश गायकवाडला भाग पाडले होते. त्यानंतरच गायकवाड याने आपल्या पतीचा छळ सुरू केला होता असे फिर्यादीत म्हटले आहे.

कोण आहे हा ध्यानगुरू ?

रघुनाथ येमूल (Astrologer Raghunath Yemul Guruji) हा सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तो स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतो. याच नावाने तो दररोज सोशल मिडियावर भविष्याचा जप करत असतो. ज्योतिषाचार्य म्हणून येमूल याची ओळख आहे. तासन् तास तो हात पाहत असल्याचे समजते. आपला हात दाखविण्यासाठी त्याची अपॉईंमेंट घ्यावी लागते. वैयक्तिक भेट घेऊन हात दाखविण्याचे तो ११ हजार रुपये घेत असल्याचे सांगितले जाते. हस्तरेषा पाहून तो भविष्य सांगतो यामुळे कॉपोरेट क्षेत्रातही त्याचा मोठा दबदबा आहे. अनेक जण त्याच्याकडून मुहूर्त काढून त्यानंतरच पुढे पाऊल टाकतात. अनेक राजकीय नेते कोणतेही नवीन पाऊल टाकण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतात. प्रशासकीय अधिकारीही आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्या दरबारात नेहमी हजेरी लावण्यासाठी जातात अशी माहिती समोर येत आहे.

म्हणून भक्त बनलेल्या ‘त्या’ कुटुंबाने केले हे कृत्य

औंधमधील उद्योजक कुटुंबही त्यांचे भक्त बनले होते. तुझी पत्नी पांढर्या पायगुणाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार ही होणार नाही व मंत्री ही होणार नाही. मी देतो हे लिंबु उतरविल्यानंतर तुझ्या मागची ही पिडा कायमची निघुन जाईल, असे त्यांना सांगितले होते. त्यांच्या (Astrologer Raghunath Yemul Guruji} भविष्यवाणीमुळेच उद्योजक पती व त्याच्या कुटूंबियांनी महिलेचा छळ केला. तिला सिगारेटचे चटके दिले. मारहाणीत तिला बहिरेपणा आला. त्यांचा छळ करुन त्यांना घराबाहेर काढले होते

“अंनिस” ने केली ही मागणी

पुण्यातील बाणेर येथील तथाकथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ राजाराम येमुल (Astrologer Raghunath Yemul Guruji) याने पुण्यातील एका उच्च शिक्षित महिलेसोबत तिच्या पतीच्या मदतीने जादुटोण्याचा प्रकार केलाय. या बाबाच्या सांगण्यावरुन पती आणि कुटुंबियांनी पीडित महिलेचा छळ केलाय. त्यामुळे तथाकथित गुरू आणि अन्य आरोपींविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शिवाजीनगर शाखेने केली आहे.

या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यातच्या शिवाजीनगर पुणे शाखेने निवेदन जारी केलंय.अंनिसच्या निवेदनात विशाल विमल यांनी म्हटले आहे की, “पीडित महिलेला नवरा, सासू-सासरे, नंदन-त्यांचे पती आदींनी मानसिक, शारीरिक, लैंगिक त्रास, शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर, आर्थिक पिळवणूक केल्यासंबंधी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हे प्रकरण बारकाईने पहाता कथित गुरूसह (Astrologer Raghunath Yemul Guruji) अन्य आरोपींवर जादूटोणा विरोधी कायद्यांतंर्गत गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे.

 

पीडित महिला झोपलेल्या ठिकाणी हळदी कुंकू टाचण्या लिंबु आदींद्वारे जादूटोणा प्रकार

विशाल विमल म्हणाले, “कथित गुरूंनी (Astrologer Raghunath Yemul Guruji) सांगितल्याने कुटुंबीय, नातेवाईक आदींनी पीडित महिला झोपलेल्या ठिकाणी हळदी कुंकू टाचण्या लिंबु आदींद्वारे जादूटोणा प्रकार केला. त्यामुळे पीडित महिलेच्या मनात भीती निर्माण करून त्रास देण्याचा प्रकार झाला. संबंधित महिलेला सिगारेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केलेली आहे. या महिलेबाबत ज्या गोष्टी घडल्या त्या जादूटोणा विरोधी कायद्यात गुन्हा म्हणून नमूद आहेत. त्यामुळे संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हावी.” अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचे कार्यकर्ते विशाल विमल यांच्यासह महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे, संदीप कांबळे, प्रवीण खुंटे यांनी निवेदन जारी करत केली आहे.