जामखेड टाईम्स वृत्तसेवा: कोरोना आपत्कालीन लसीकरणाचा (Corona Vaccine) देशातील मार्ग मोकळा झाला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात सीरमची कोविशिल्ड लस बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती सीरम इन्सिट्यूटचे आदर पुनावाला (Serum Institute of India Chairman Adar Poonawalla) यांनी ट्विट करून दिली आहे.
सीरम आणि भारत बायोटेकच्य कोरोना लसीला (Covid 19 Vaccine) तातडीच्या वापरास परवानगी
आदर पुनावाला यांनी ट्विट करून माहिती देताना म्हटले आहे की, आपल्या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. योग्य ती सर्व खबरदारी घेऊन कोरोना लसीचा साठा केला आहे. घेतलेले श्रम सार्थक झाले असून देशातील पहिल्या कोविशिल्ड ( COVISHIEL) या कोरोना लसीला मान्यता देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात कोरोना लस बाजारात उपलब्ध होईल. (India first COVID 19 vaccine ready to roll out in the coming weeks says Serum Institute of India Chairman Adar Poonawalla) कोरोना लसीच्या वापराची शिफारस करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याची शिफारस केली होती. यानंतर आज (03 रोजी भारतीय औषध नियंत्रकांनी (DCGI) अंतिम मंजुरी दिली आहे. आज डीसीजीआयने उभय लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी आनंद व्यक्त केला आहे.