एलसीबीची जामखेडमध्ये धाड अन नगरसेवकांची पोलिस स्टेशनला धावाधाव ! (LCB raids Jamkhed and corporators rush to police station)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : मंगळवारी सायंकाळी एलसीबीने जामखेड बाजारतळावरील एका मावा बनवण्याच्या अड्ड्यासह मटका अड्ड्यावर धाडी टाकण्याची कारवाई केली. कारवाई होताच आरोपीच्या बचावासाठी जामखेड पोलिस स्टेशनला अनेकांनी गर्दी केली होती. विशेषता: दोन नगरसेवकांची पोलिस स्टेशन आवारातील लगबग विशेष लक्ष वेधणारी ठरली. (LCB raids Jamkhed and corporators rush to police station) एलसीबीच्या कर्मचार्यांसोबत ते दोन नगरसेवक संवाद साधत असल्याचे दिसून आले. त्या दोन नगरसेवकांचा वावर संशयास्पद वाटत होता. नेमक्या कोणत्या अवैध्य व्यवसायिकाच्या बचावासाठी ते दोन नगरसेवक एलसीबीच्या पथकाशी संवाद साधत होते याचाच उशिरापर्यंत उलगडा झाला नाही. परंतु मात्र त्या दोन नगरसेवकांच्या भूमिकेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एलसीबीच्या पथकाने बाजारतळावरील सागर पान सेंटरवर मंगळवारी सायंकाळी धाड टाकली. या धाडीत 12 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान पोलिस काँस्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून सचिन सोपान डिसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे मावा बनवणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. येत्या दोन दिवसांत जामखेड पोलिसांची अवैध्य व्यवसायिकांविरोधात पुन्हा आक्रमकपणे कारवाया सुरू होतील अशी माहिती सुत्रांकडून मिळत असल्याने आता दोन नंबरवाल्यांची खैर नाही हे मात्र निश्चित.
एलसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जामखेड शहरातील मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत 01 हजार 380 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस काँस्टेबल प्रकाश वाघ यांच्या फिर्यादीवरून रज्जाक बशीर पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मटका व्यवसायिकांची सुटका व्हावी यासाठी शहरातील बडा मटका व्यवसायिकही पोलिस स्टेशनमध्ये एलसीबीच्या पथकाशी चर्चा करताना दिसून आला. ही चर्चा सेटलमेंटची होती की अन्य याबाबत आता उलटसुलट चर्चा पोलिस स्टेशन आवारात रंगली होती. दरम्यान दोन्ही कारवायांचा पुढील तपास हेड काँस्टेबल शिवाजी भोस व पोलिस नाईक कोळपे हे करत आहेत.
या कारवाईच्या पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हेड काँस्टेबल भाऊसाहेब कुरूंद,पो. काॅ रणजीत जाधव, संभाजी कोतकर,प्रकाश वाघ, जामखेड पोलिस स्टेशनचे हेड काँस्टेबल शिवाजी भोस, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव यांचा समावेश होता.