Mohan Bhagwat : एकही मुस्लिम राहू नये असं कुणी हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही;हिंदू-मुस्लिम एकता हा शब्दच भ्रम निर्माण करणारा आहे
दिल्ली ( जामखेड टाईम्स वृत्तसेवा ) :लिंचिंग करणारे गुन्हेगार आहेत. (Mohan Bhagwat said there are criminals who commit lynching) आम्ही त्यांचे कधीच समर्थन करत नाही,हिंदू-मुस्लिम एक आहेत.कारण आपली मायभूमी एकच आहे. पूजनाची पद्धत वेगवेगळी असल्याने आपल्याला वेगळं करता येणार नाही. संघ जोडण्याचे काम करतो, तर राजकारण हे तोडण्याचे शस्त्र बनवण्यात आलं आहे. राजकारणामुळेच हिंदू-मुस्लिम एक होऊ शकत नाही. राजकारणामुळे जो फुटिरतावाद निर्माण झाला आहे तो आता हटवावा लागेल असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले आहे. (If a Hindu says that no Muslim should live here, then the person is not Hindu. Cow is a holy animal but the people who are lynching others are going against Hindutva. Law should take its own course against them without any partiality: RSS chief Mohan Bhagwat in Ghaziabad)
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार; माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सल्लागार असलेल्या ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या ‘वैचारिक समन्वय-एक पहल’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सरसंघचालक मोहन भागवत(RSS chief Mohan Bhagwat) हे गाझियाबादमधील मेवाड कॉलेजमध्ये आले होते. त्या कार्यक्रमात भागवत यांनी वरिल मत व्यक्त केले आहे. (RSS chief Mohan Bhagwat had come to Mewad College in Ghaziabad for the publication of a book titled ‘The Meetings of Minds: A Bridging Initiative, written by Dr Khawaja Iftikhar Ahmed’, an advisor to Former Prime Minister P. V. Narasimha Rao. Bhagwat has expressed the above opinion in that program.)
हिंदू-मुस्लिम एकता हा शब्दच भ्रम निर्माण करणारा
पुढे बोलताना सरसंघचालक भागवत (RSS chief Mohan Bhagwat) म्हणाले की,आपण या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आल्याने यामागे मतांचे राजकारण आहे, असं इतरांनी समजू नये. हिंदू-मुस्लिम एकता हा शब्दच भ्रम निर्माण करणारा आहे. हिंदू-मुस्लिम हे वेगळे नाहीच. कायमच एक आहेत. जेव्हा लोकं दोघांना वेगळं समजतात तेव्हा संकट निर्माण होतं. आपल्या श्रद्धेचा आकार आणि निराकार दोन्ही समान आहेत. काही लोक अल्पसंख्यांक म्हणतात. पण आपण सर्वजण एक आहोत, असं आम्ही म्हणतो. आम्ही हिंदू म्हणतो तुम्ही भारतीय म्हणता. शब्दांच्या भानगडीत पडू नका. भारताला विश्वगुरू बनवायचे आहे. हिंदू संपवून टाकतील असं अल्पसंख्यांकांवर बिंबवलं जातंय. पण कुणा अल्पसंख्याकांवर अन्याय होतो तेव्हा आवाज उठवणारा हा बहुसंख्यकच असतो. आग लावणारा भाषण देऊन प्रसिद्धी मिळवू शकतो. पण त्याचा उपयोग होणार नाही, असं भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांनी सांगितलं.
मुस्लिम समाजाने कट्टरता सोडून बंधुभावाच्या मार्गावर चालावं, असं डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यावेळी म्हणाले. (Dr Khawaja Iftikhar Ahmed)
सर्व भारतीयांचा डीएनए हा एक आहे. भाषा, प्रदेश आणि इतर विषमाता सोडून सर्व भारतीयांनी आता एक होण्याची आणि भारताला विश्वगुरू बनवण्याची वेळ आली आहे. भारत विश्वगुरू झाल्यावरच जग सुरक्षित होईल. एकही मुस्लिम राहू नये, असं कुणी हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. जे दुसऱ्यांना मारत आहेत ते हिंदुत्वाविरोधात आहेत.लिंचिंग करणारे गुन्हेगार आहेत. आम्ही कधीच त्यांचे समर्थन करत नाही अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जावी असं मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांनी स्पष्ट केलं.
“The DNA of all Indians is one. It is time for all Indians, except for language, region and other heterogeneities, to unite and make India a world leader. The world will be safe only when India becomes a world leader. If a Hindu says that no Muslim should remain, then he is not a Hindu. Those who are killing others are against Hindutva. Those who commit lynching are criminals.RSS chief Mohan Bhagwat clarified that strict action should be taken against those who never support them.”