ISPL : मुन्नवर फारूकीने घेतली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विकेट अन् स्टेडियमवर भयाण शांतता, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2024
ISPL Sachin Tendulkar Munnawar farukhi : इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीगच्या सामन्यात एक मोठी घटना बुधवारी घडली आहे. (Indian Street Premier League) या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.कारण बिग बॉस विजेता मुन्नवर फारूकीने इंडियन स्टीट प्रीमियर लिगच्या एका सामन्यात गोलंदाजी करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची विकेट घेतली आहे. (Munnavar Farooqui took the wicket of Sachin Tendulkar) हाच व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 10 वर्षे होत आली आहेत. सचिन तेंडुलकर सहसा कोणत्याही सामन्यात खेळताना दिसत नाही.मध्यंतरी काश्मीर दौर्यावर असताना तो एका रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसला होता.त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला होता. त्यानंतर आता इंडियन स्ट्रीट प्रीमीयर लीग स्पर्धेत सहभागी झालेल्या सचिनचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या बुधवारी झालेल्या सामन्यात टीम मास्टर्स इलेव्हन वि. टीम खिलाडी इलेव्हन आमने सामने होते. सचिन तेंडुलकर याने धडाकेबाज बॅटींग केली होती. अवघ्या 16 बॉलमध्ये 30 धावा केल्या होत्या. मुनव्वर फारूकी यालाही सचिनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु बॅटची कट लागून कॅच उडाला, कीपरने हा कॅच पकडला आणि मुनव्वर याने सचिनची विकेट घेतली. त्यावेळी सर्व स्टेडियममध्ये भयाण शांतता पसरलेली पाहायला मिळाली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम मास्टर्स इलेव्हन संघाने 94-7 धावा केल्या. तर टीम खिलाडी इलेव्हन संघाला 89-6 धावाच करता आल्या. टीमच्या मालकांमध्ये करीना कपूर खान, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, रॉबिन उथप्पा, अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटी सहभागी झालेत.
दरम्यान, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. या लीगमध्ये सहा संघ सहभागी आहेत, 6 मार्च ते 15 मार्च दरम्यान ही स्पर्धा असणार आहे. सचिन तेंडुलकर ISPL 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. हे सामने टेनिस बॉलने खेळवले जात आहेत. फारूकी याने सचिनची विकेट घेतल्याने लीगही चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे.