दिल्ली : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दिला जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारावर महाराष्ट्रातील चार युवकांनी आपले नाव कोरले आहे. (Four youths from Maharashtra were honored with the National Youth Award given by the Union Ministry of Youth Welfare and Sports)
आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्याने साधून दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते व्यक्तिगत व संस्थात्मक श्रेणींमध्ये वर्ष २०१७-२०१८ आणि वर्ष २०१८-२०१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारांनी देशातील युवकांना सन्मानित करण्यात आले. (On the occasion of International Youth Day, Union Minister for Youth Welfare and Sports Anurag Thakur presented National Youth Awards for the year 2017-2018 and 2018-2019 in individual and institutional categories at Vigyan Bhavan, Delhi.)
पुणे येथील सौरभ नवांदे आणि चेतन परदेशी, जळगाव येथील रणजितसिंह राजपूत यांना वर्ष २०१७-२०१८ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कार तर नागपूर येथील सिध्दार्थ रॉय यांना वर्ष २०१८-२०१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. (Saurabh Nawande and Chetan Pardeshi from Pune, Ranjit Singh Rajput from Jalgaon were awarded the National Youth Award for the year 2017-2018 while Siddharth Roy from Nagpur was honored with the National Youth Award for the year 2018-2019.)
यावेळी मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वयक डियर्ड बॉयडंड (Deirdre Boydand, United Nations Resident Coordinator in India) उपस्थित होत्या. या कार्यक्रमात वर्ष २०१७-२०१८ साठी १४ तसेच वर्ष २०१८-२०१९ साठी ८ अशा एकूण २२ राष्ट्रीय युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. व्यक्तिगत पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये, पदक आणि प्रमाणपत्र तर संस्थात्मक पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रुपये, पदक आणि प्रमाणपत्र असे आहे.
श्री @ianuragthakur ने विज्ञान भवन में अपने क्षेत्रों में सर्वश्रेष्ठ प्रदर्शन के करने वाले 22 युवा पुरस्कार विजेताओं राष्ट्रीय युवा पुरस्कार से सम्मानित किया ।यह राष्ट्रीय युवा पुरस्कार 2017-18 और 2018-19 के वर्षों के लिए दिए गये । pic.twitter.com/yrXrMDg0Zo
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) August 12, 2021