Nikita Porwal Femina Miss India World 2024 : उज्जैनच्या निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब, कोण आहे निकीता पोरवाल ? जाणून घ्या तिचा प्रवास

Nikita Porwal Femina Miss India World 2024 :  फेमिना मिस इंडिया २०२४ या सौंदर्य स्पर्धेत मध्यप्रदेशातील उज्जैन येथील निकीता पोरवाल हिने मिस इंडियाचा किताब पटकावला. सौंदर्य आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर निकीता पारवालने प्रतिष्ठेची मिस इंडीया ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत रेखा पांडे (Rekha Pande) ही उपविजेती ठरली. मिस इंडिया स्पर्धा मुंबईत पार पडली. या स्पर्धेत विजेती ठरलेली निकीता पोरवाल कोण आहे ? तिचा आजवरचा प्रवास काय ? चला तर मग जाणून घेऊयात.

Nikita Porwal Femina Miss India World 2024, Nikita Porwal of Ujjain won the Miss India title, who is Nikita Porwal? Know her journey,

निकीता पोरवाल ही मध्यप्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी आहे. तिने वयाच्या १८ व्या वर्षी टिव्ही अँकर म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली.तिने ६० पेक्षा अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे २५० पानी ‘कृष्ण लीला’ हे नाटक तीने लिहले आहे. याशिवाय एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात तिच्या एका चित्रपटाचे स्क्रीनिंग पार पडले आहे. लवकर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे.

मुंबईत यंदाची फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२४ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत निकीता पोरवाल हिने बाजी मारली. २०२३ ची मिस इंडिया नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) हिने निकीताच्या डोक्यावर विजेतेपदाचा क्राऊन घातला. यावेळी पार पडलेल्या स्पर्धेत संगिता बिजलानी हीने रॅम्पवाॅक करत सर्वांचेच लक्ष वेधले.

मिस इंडिया निकीता पोरवाल ही पेट्रो केमिकल व्यावसायिक अशोक पोरवाल (Ashok Porwal) यांची मुलगी आहे. निकीता हिने बॅचलर ऑफ परफाॅर्मिंगची पदवी संपादन केली आहे. काॅलेजमध्ये तीला नाटकाची आवड निर्माण झाली. तेव्हापासून ती अभिनयाकडे जास्त आकर्षित झाली. अभिनयासोबतच तिला वाचन, लेखन, चित्रपट पाहणे व चित्रकला याचा छंद आहे.

निकीता पोरवाल ही सोशल मिडीयावर फारसी सक्रीय नसते. मिस इंडियाचा किताब जिंकण्याआधी Instagram वर फक्त ५ हजार फाॅलोवर्स होते. निकीताने अतिशय कमी वयात मिस इंडियाचा किताब जिंकून जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. तिचा हा यशाचा प्रवास तिच्या कुटुंबियांसाठी अभिमानास्पद ठरला आहे. निकीताने  लहान वयात प्रचंड मेहनत घेत मिस इंडिया होण्याचा बहुमान मिळवला. तिचा हा प्रवास प्रेरणादायक आहे.