जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात वेगवेगळ्या कारणांनी सोशल मिडीयासह वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चेत राहत असलेल्या आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघासाठी एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या नव्या उपक्रमांमुळे रोहित पवार हे पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले आहेत. रोहित पवार यांच्या पुढाकारातून वैयक्तिक पातळीवर ही योजना राबवली जाणार आहे. या विषयीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थतर्फे करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्याने निराधार झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे ‘आधार’ या उपक्रमाच्या माध्यमांतून निराधार महिलांना स्वयं रोजगार सहाय्य, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात राबवला जाणार आहे.