Rinku Singh engagement : ठरलं रे ! क्रिकेटर रिंकू सिंग अडकणार लग्नबंधनात, कोण आहे Priya Saroj जिच्यासोबत रिंकूने केली एंगेजमेंट?

Rinku Singh engagement : आयपीएलमुळे (IPL) प्रकाशझोतात आलेला आणि नंतर भारतीय क्रिकेट टीमचा भाग बनलेल्या रिंकू सिंगने त्याच्या लाखो चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी (Good News) दिली आहे. रिंकू सिंग आता वैवाहिक इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रिया सरोज (Priya Saroj) या तरूणीसोबत रिंकू सिंगचा (Rinku Singh) नुकताच साखरपुडा (engagement) पार पडला आहे. कोण आहे प्रिया सरोज ? जाणून घेऊयात!

Rinku Singh Engagement, It's done,  Cricketer Rinku Singh will get stuck in marriage, who is Priya Saroj with whom Rinku Singh got engaged?
चर्चेतल्या बातम्या

भारतीय क्रिकेट (cricketer) संघातील महत्वाचा खेळाडू असलेल्या रिंकू सिंगचा साखरपुडा समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Priya Saroj Engagement) यांच्याशी झाला आहे. प्रिया सरोज उत्तर प्रदेश मधून समाजवादी (samajwadi Party) पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. प्रिया सरोज (Priya Saroj MP) समाजवादी पक्षातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात तरूण खासदार आहेत. रिंकू व प्रिया सरोज हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. परंतू रिंकू आणि प्रिया या दोघांनी साखरपुड्याबाबत अद्यापपर्यंत अधिकृत माहिती जारी केलेली नाही. (Rinku Singh engagement)

Who is Priya Saroj ? कोण आहे प्रिया सरोज ?

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध राजकीय नेते तुफानी सरोज यांची प्रिया सरोज ही कन्या आहे. तिचा जन्म २३ नोव्हेंबर १९९८ साली झाला. तिचे दिल्ली विद्यापीठातून शिक्षण झाले आहे. ती पेशाने वकिल आहे. वयाच्या २५ व्या वर्षी तिने राजकारणात पाऊल टाकले.२०२४ लोकसभा निवडणुकीत तिने मछली शहर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भोलानाथ सरोज यांचा पराभव करत प्रिया सरोज हीने राजकारणात दमदार एन्ट्री केली. समाजवादी पक्षाच्या सर्वात तरूण खासदार ती बनली आहेत. त्या उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. तिच्या वडिलांनी तीनदा खासदार म्हणून काम केले आहे. (Rinku Singh engagement)

Rinku Singh engagement

रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. त्याला आयपीएल २०२५ साठी कोलकाताने १३ कोटी रुपयांना संघात कायम केले आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामातही तो कोलकाताकडून खेळताना दिसणार आहे. त्याने आयपीएलमध्ये ४६ सामने खेळले असून ८९३ धावा केल्या आहेत.

२७ वर्षीय रिंकू सिंगने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतो. त्याने भारतासाठी २ वनडे आणि ३० टी२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याने ५५ धावा केल्या आहेत, तर १ विकेट घेतली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३० सामन्यांत ५०७ धावा केल्या आहेत, तर २ विकेट्स घेतल्या आहेत.

रिंकू सिंग आता २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी२० मालिकेत भारताकडून खेळताना दिसणार आहे. त्याची निवड भारतीय संघात झाली आहे. तो भारताच्या टी२० संघातील नियमित खेळाडूंपैकी एक आहे.