जामखेड टाईम्स वृत्तसेवा
मागील सहा वर्षांपासुन जामखेड शहरात समृद्धी मिल्क अँण्ड मिल्क प्राँडक्टच्या उत्पादनांनी अल्पावधीत लोकांनी पसंती मिळवली आहे. आता समृध्दीने आईसक्रीमच्या उत्पादनास सुरूवात केली आहे. या उत्पादनालाही आता ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनीही नुकताच समृद्धी आईसक्रीमचा आस्वाद घेतला.
लोकांना काय हवं ते आम्ही द्यावं असा रूचकर विचार करत वैभव कुलकर्णी, विपुल कुलकर्णी, वेदांत कुलकर्णी बंधुंनी जामखेड शहरात समृध्दी मिल्क अँण्ड मिल्क प्राँडक्टच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून निर्भेळ दूध,आईस्क्रीम,लस्सी, ताक, तुप, केक आदी दुग्धजन्य पदार्थ जामखेडकरांना पुरवत आहेत. समृध्दीची उत्पादने जामखेडकरांसह आसपासच्या तालुक्यात लोकप्रिय ठरत आहेत. आमदार रोहित पवार यांनी समृध्दीच्या उत्पादनांचे यावेळी कौतुक केले.