जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj ) हे नाव उच्चारताच अवघा महाराष्ट्र (Maharashtra)शिवरायांच्या धगधगत्या विचारांनी पेटून उठतो. दरवर्षी जगभरात शिवजयंती (shivJayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. परंतु पारंपारिक पध्दतीने साजर्या केल्या जाणार्या शिवजयंतीला फाटा देत यंदा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) तालुक्यात एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात शेतकर्यांच्या काडीला जर धक्का लावला तर त्या काळात कठोर शिक्षा करत शेतकरी हित जोपासले होते. शिवरायांच्या याच कार्याची आठवण नव्या पिढीला व्हावी याकरिता खेडकर कुटूंबाने आपल्या शेतात शिवजयंती साजरी करत शिवविचारांचा कृतीशील जागर केला. खेडकर कुटूंबाच्या या अनोख्या कृतीचे सोशल मिडीयावर शिवप्रेमींकडून मोठ्या कौतूक करण्यात आले.