धक्कादायक: जामखेडमध्ये जादुटोण्यासाठी घुबडाचा वापर ? Shocking: The use of owls for witchcraft in Jamkhed?
काळू जादूच्या नावाखाली दुर्मिळ जातीच्या घुबडांची तस्करी करण्याच्या घटना देशात सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहेत. विक्री करून त्यातून लाखो रूपयांचे व्यवहार करून फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत असताना आता शृंगी जातीच्या दुर्मिळ घुबडाची काळ्या जादुसाठी तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता जामखेडमधून समोर आला आहे. (Shocking: The use of owls for witchcraft in Jamkhed?)
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या विशेष पथकाने कारवाई करत घुबडाची तस्करी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सात जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये जामखेड शहरातील एका हाॅटेल चालकाचा समावेश आहे. तर इतर तस्कर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम व परांडा तालुक्यातील आहेत. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हा बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
घुबड (Owl) तस्करीच्या रॅकटचे पाळेमुळे कोण खोदणार ?
जामखेडमध्ये अंधश्रध्देच्या नावाखाली मोठे रॅकेट तर चालवले जात नाही ना ? अंधश्रध्देतून जामखेडमध्ये मोठी दुर्घटना तर घडवण्याचा डाव विकृत प्रवृत्तींचा तर नाही ना ? याचा मुळापासुन शोध घेतला जाणे आवश्यक आहे. जामखेड शहर घुबड तस्करीचे केंद्र तर बनले नाही ना ? या तस्करांना जामखेडमध्ये कुणाचे राजकीय पाठबळ तर नाही ना ? असेल तर ती राजकीय शक्ती कोण ? याचा छडा पोलिस लावणार की वनविभाग ? हा सवाल आता जनतेतून जोर धरू लागला आहे.