Success Story : “जिद्द आणि मेहनतीचा अनोखा संगम ; कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील 4 भावंड पोलिस दलात, जाणून घ्या या भावंडांचा संघर्ष आणि यशाचा प्रेरणादायक प्रवास !”
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। Success Story। एकिकडे वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा या हट्टातून समाजात स्त्री भ्रूण हत्या केल्या जातात. पण दुसरीकडे मुलींना जन्माला घालून त्यांना पाठबळ देणारे कुटुंबही कमी नाहीत. ज्या घरात मुली जन्माला येतात त्या मुलांपेक्षा मागे नाहीत, त्याही विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. कुटूंबाचा मान सन्मान वाढवत आहेत. आई वडिलांनी दिलेल्या पाठबळावर सावित्रीच्या या लेकी यशोशिखरावर जात आहेत. अशीच कहाणी आहे कर्जत तालुक्यातील सुपा गावातील मोटे कुटुंबाची. याच मोटे कुटुंबातील चौघा भावंडांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास प्रेरणादायक व अभिमानास्पद आहे. जाणून घेऊयात त्यांची ही प्रेरणादायी कहाणी ! Success Story
कर्जत शहरापासून किलोमीटर आठ ते दहा किलोमीटर अंतरावर सुपा हे गाव आहे. हा भाग तसा जिरायती. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी येथील शेती. याच गावात अंकुश मोटे यांचे शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहे. अंकुश मोटे यांचे ९ वी पर्यंत तर पत्नी कमल यांचे ७ वी पर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यांना सोनाली, रूपाली, रोहिणी, ज्ञानेश्वर असे चार अपत्य आहेत. (Success Story, Sonali Mote, Rupali Mote, Rohini Mote, Dnyaneshwar Mote)
अत्यल्प शिक्षण घेऊनही आपल्या लेकरांनी चांगलं शिक्षण घ्यावं, शिकून मोठं व्हावं याकरिता त्यांचा संघर्ष सुरू होता. त्यांच्या याच संघर्षातून आणि कठोर परिश्रमाला चौघा लेकरांनी साथ दिली. आई वडिलांनी पाहिलेलं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी चौघा भावंडांनी जिद्दीने परिश्रम घेतले. आज हे चौघे सख्ये भावंड महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले आहेत. (Success Story, Sonali Mote, Rupali Mote, Rohini Mote, Dnyaneshwar Mote)
मोटे कुटुंबातील थोरली मुलगी सोनाली अंकुश मोटे ही जिद्दी आणि महत्त्वकांक्षी होती. बारावीला असतानाच तिचे लग्न झाले. विवाहित असतानाही तिच्यातील जिद्द कमी झाली नाही. लग्नानंतर तिने बारावीचे पेपर देत आपले शिक्षण पूर्ण केले. म्हणतात ना मनात जिद्द आणि कठोर परिश्रम घेतले की आकाशालाही गवसणी घालणे मुश्किल नसते. त्यानुसार २०१२ साली सोनालीच्या आयुष्यात सोनेरी दिवस उगवला. ती पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती झाली. या यशाने तिचा कुटूंबाला नवा उत्साह दिला. तिने आपल्या इतर भावंडांसाठी आदर्श निर्माण केला. (Success Story, Sonali Mote, Rupali Mote, Rohini Mote, Dnyaneshwar Mote)
घरातील इतर भावंडासाठी सोनाली आयडॉल ठरली. तिच्या पावलावर पाऊल टाकत २०१७ साली दुसरी बहीण रुपाली ठाणे पोलिस दलात, तर तिसरी बहीण रोहिणी अंकुश मोटे २०१७ मध्येच मुंबई शहर पोलिस दलात रुजू झाली. अल्प शिक्षण असणाऱ्या कुटुंबातील तिन्ही बहिणी पोलीस दलात रुजू झाल्या. जिरायत शेतीवर गुजराण करणाऱ्या आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले. अंकुश आणि कमल मोटे यांच्या तिन्ही कन्यांनी त्यांचे नाव तालुका आणि जिल्ह्यात उज्वल केले. (Success Story, Sonali Mote, Rupali Mote, Rohini Mote, Dnyaneshwar Mote)
तीन पोलीस कन्यांचे माता-पिता म्हणून सुपे गावात त्यांना ओळखू जाऊ लागले. हे यश सुखदायी असतानाच त्यांचा लहान असणारा मुलगा ज्ञानेश्वरने देखील सप्टेंबर २०२४ मध्ये आपले नाव पोलीस दलात कोरले. तो देखील पुणे ग्रामीण पोलिस दलात रुजू झाला. या चार बहिण-भावंडाने आपल्या आई-वडिलांच्या अपार कष्टाचे चीज केले. एकाच कुटुंबातील चौघे महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाल्याचा फार दुर्मिळ योग सुपे (ता.कर्जत) येथील मोटे कुटुंबियांनी रचला. मोटे कुटुंबातील चौघा भावंडांची ही कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.विपरीत परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम हाच उपाय आहे हेच मोटे कुटुंबातील चौघा भावंडाच्या यशाचे खरे गमक आहे. (Success Story, Sonali Mote, Rupali Mote, Rohini Mote, Dnyaneshwar Mote)
Success Story : गरिबीला कवटाळून बसण्यापेक्षा मनात जिद्द आणि कठोर परिश्रमाने यश मिळवा
सोनाली मोटे सांगते, “गरिबीला कवटाळून बसण्यापेक्षा मनात जिद्द आणि कठोर परिश्रमाने यश मिळवा”, गरिबी जरी असली किंवा पाठबळ जरी भक्कम नसलं तरी स्वताच्या मनातील जिद्द आणि त्यासाठी घेतलेली कठोर मेहनत स्वप्नपूर्ती करू शकते. आम्ही तिन्ही बहिणींनी शेजारच्या रानात रोजंदारीवर खुरपणीचे काम केले आहे. त्यामुळे गरिबी कवटाळून बसण्यापेक्षा आयुष्यात जिद्दी बना. ध्येयवादी होत यश सहज गाठता येते असं त्या अभिमानाने सांगतात. (Success Story, Sonali Mote, Rupali Mote, Rohini Mote, Dnyaneshwar Mote)
अवघड परिस्थिती आणि आई वडिलांची कमी शैक्षणिक पार्श्वभूमी असतानाही, त्यांच्या संघर्षाचे चीज करण्यासाठी जिद्द आणि कठोर परिश्रम हेच यशाचा मार्ग उघडू शकतात, हेच मोटे कुटुंबातील चौघा भावंडांनी हेरले.त्यांनी आर्थिक अडचणींचा सामना करत शिक्षणाचा मार्ग सुरू ठेवला. त्यांच्या मनात कधीही हार मानण्याची भावना आली नाही. कठोर मेहनतीच्या बळावर या भावंडांनी स्वप्नपूर्ती करून दाखवली, मोटे कुटूंबातील लेकरांची ही संघर्षमय कहाणी अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देऊ पाहणारी प्रेरणादायी कथा आहे. (Success Story, Sonali Mote, Rupali Mote, Rohini Mote, Dnyaneshwar Mote)