तपनेश्वर परिसर रोडरोमियोंच्या विळख्यात; महिलांची सुरक्षा आली धोक्यात ! (Tapneshwar campus in the clutches of roadrunners; Women’s safety in danger)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेेख) : जामखेड शहरातील तपनेश्वर रोड परिसर रोडरोमियोंच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. या भागातील महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी या रोडरोमियोंचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता महिला वर्गातून जोर धरू लागली आहे. (Tapneshwar campus in the clutches of roadrunners; Women’s safety in danger)
सविस्तर असे की, जामखेड शहरातील तपनेश्वर रोड परिसर हा सर्वात गजबजलेला परिसर आहे. या भागातील नागरिक रात्रीच्या वेळी शतपावली करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. तसेच माँर्निंग वाॅकसाठीही वापर करतात. या भागातील टवाळखोर रात्रीच्या वेळी टोळ्या करून वेगवेगळ्या भागात थांबतात. काही टवाळखोर भरधाव वेगाने दुचाक्या चालवतात. नागरिकांना त्रास देतात. शिविगाळ करतात. या भागात काही क्लासेस आहेत. त्या परिसरातही रोड रोमिओ ठाण मांडून असतात. टवाळखोर रोडरोमियोंमुळे या भागातील नागरिकांची विशेषतः महिला व मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या टवाळखोरांविरोधात थेट तक्रार करण्याची हिम्मत कोण करत नाही. आजवर या टवाळखोरांचा बिमोड करण्यात जामखेड पोलिस अपयशी ठरले आहेत.