google pay india app | गुड न्यूज : बँकांप्रमाणे गुगलने सुरू केली फिक्स्ड डिपॉझिट एफडी योजना 2021

गुगलने फिनटेक कंपनीशी करार केला : जाणून घ्या एफडी योजना व्याजदर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | google pay india app launched Fixed deposit FD scheme | इंटरनेट म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते Google या बलाढ्य सर्च इंजिन कंपनीचे. गुगल कंपनीने बँकिंग क्षेत्रात नवे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल भारतात लवकर FD योजना सुरू करणार आहे. यासाठी गुगलने फिनटेक कंपनीशी करार केला आहे. (Google agreement with Fintech company) गुगलची ही योजना बँका आणि बिगर-बँकिंग संस्थांप्रमाणेच असणार आहे. ही मुदत ठेव योजना गुगल पे (google pay upi id ) द्वारे भारतातील ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. (google fd scheme with fintech)

कोरोना (covid19india) महामारी काळापासून गुगल पे च्या वापरात भारतात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग साठी google pay upi id सारख्या मोबाईल ऐपचा वापर वाढला आहे. भारतात गुगल पे वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या (google pay india app) 15 कोटी पेक्षा अधिक आहे. या ग्राहकांना अधिकाधिक बँकिंग सुविधा देण्यासाठी गुगलने मुदत ठेव योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.(Google Fixed Deposit Fd scheme 2021)

त्यासाठी गुगलने एपीआय सेवा पुरवणाऱ्या फिनटेक (fintech company) कंपनीशी FD scheme चालवण्यासाठी करार केला आहे. Googled FD ची योजना भारतातील ग्राहकांना फक्त फिनटेक कंपनी सेतूच्या (setu fintech ) API द्वारे दिली जाणार आहे. या सेवेचा व्यवहार गुगल पे (google pay india app) द्वारे करावा लागणार आहे. गुगल स्वतःची FD योजना विकणार नाही, परंतु गुगल पे द्वारे ग्राहकांना इतर बँकांची FD घेता येईल. सुरुवातीला इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एफडी ग्राहकांना दिली जाईल.

google pay india app
google pay india app launched Fixed deposit FD scheme

गुगल पे एफडी कसे उघडावे ? (How to open google pay india app fd?)

गुगलची ही एफडी योजना घेण्यासाठी ग्राहकाला त्यांचा आधार क्रमांक देऊन केवायसी (Aadhar KYC) करावे लागेल.आधार क्रमांकाच्या आधारावर मोबाईलवर एक ओटीपी येईल. यासाठी ‘सेतू’ने API साठी बीटा आवृत्ती तयार केली आहे. त्यावर सध्या काम चालू आहे, जेणेकरून ही योजना लवकरात लवकर सुरू करता येईल. ही सुविधा पूर्णपणे मोबाईल आधारित असेल. लोकांमध्ये गुगल पेच्या (Gpay) वापराची ज्या प्रकारे वाढ झाली आहे, त्याचा विचार करता गुगल पे मध्ये (google pay india app ) FD योजना चालवणे हा एक मोठा उपक्रम मानला जात आहे.इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एफडी (Equitas Small Finance Bank FD) एक वर्षासाठी दिली जाईल. यावर ग्राहकांना जास्तीत जास्त 6.35 टक्के व्याज दिले जाईल.

आता तुम्हाला FD साठी फक्त बँका किंवा बिगर बँकिंग संस्थांवर अवलंबून राहावे लागणार नाही. एफडीसाठी बँकांमध्ये जाण्याची देखील गरज भासणार नाही.आता हे काम मोबाईलवरून गुगल पे (google pay india) सारख्या मोबाईल वॉलेटद्वारे करता येणार आहे. गुगलच्या एफडीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकाचे इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेत खाते असणे आवश्यक नाही.

आजच्या काळात गुंतवणुकीच्या दृष्टीने भारतातील लोकांचे सर्वाधिक लक्ष म्युच्युअल फंड आणि स्टॉकवर आहे. परंतु जेव्हा बचतीचा प्रश्न येतो तेव्हा मुदत ठेवी FD सर्वात विश्वासार्ह असतात.मात्र, FD योजनेमध्ये लाभ उपलब्ध असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ज्या दराने लोक बचत खात्यात पैसे ठेवतात. त्यामुळे Google चा विचार आहे की, लोकांना Google Pay द्वारे FD शी जोडले जाऊ शकते.

Google च्या FD मध्ये ग्राहकाच्या गुगल पे मधून (google pay india) FD मध्ये पैसे जमा केले जातील आणि जेव्हा FD मॅच्यूअर होईल, तेव्हा त्याचे पैसे ग्राहकाच्या Google Pay खात्यात ट्रान्सफर केले जातील. यामध्ये ग्राहकाचा इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेशी नव्हे तर गुगल आणि गुगल पेशी थेट संबंध असेल.

गुगलपे एफडीचे संभाव्य व्याजदर (interest rates of google pay india app FD)

7-29 दिवस, 30-45 दिवस, 46-90 दिवस, 91-180 दिवस, 181-364 दिवस आणि 365 दिवसांसाठी FD योजना API च्या बीटा आवृत्तीवर दिली जाईल.सर्वात कमी दिवस FD साठी 3.5% व्याज आणि 1 वर्ष FD साठी 6.35% व्याज दिले जाईल. गुगल मुदत ठेव योजना 2021 (Google Fixed Deposit scheme 2021) करोडो ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास गुगलकडून व्यक्त केला जात आहे.