जामखेड टाईम्स वृत्तसेवा | indian passport seva : भारतीय नागरिक नौकरी, शिक्षण, व्यवसाय, धार्मिक यात्रा तसेच पर्यटनासाठी भारताबाहेर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विदेशात जाणाऱ्या प्रवाश्याकडे पासपोर्ट (indian passport) व व्हिसा (Visa) असणे खुप महत्वाचे असते. पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात.देशात आता पासपोर्ट केंद्रांमध्ये (Passport Center) वाढ होत आहे.पोस्टातही (Post Office ) पासपोर्ट अर्ज (indian passport application) करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. यामुळे आता पासपोर्टसाठी अर्ज करणे खूप सोपे झाले आहे. (Passport application facility has also been created in the post office.)
indian passport seva | पासपोर्ट मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असाल तर आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस कॉमन सर्व्हिस सेंटर (Post Office Common Service Center) किंवा CSC काउंटरला भेट देऊन तुम्ही अर्ज करू (indian passport application) शकता. दरम्यान पासपोर्ट काढण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ? तसेच पासपोर्ट नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया कशी केली जाते याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. (What exactly are the documents required to get a passport? Also how to process passport registration online)
indian passport seva | सुरूवातीला आपण पासपोर्टसाठी कोणती कागदपत्रे लागतात? (What are the documents required for a passport?) याची माहिती जाणून घेऊ.
A) ओळखपत्र
1)आधार कार्ड – Aadhaar card
2) निवडणूक मतदार ओळखपत्र – Election voter ID card
3) कोणताही वैध फोटो आयडी – Any valid photo ID
B) आवश्यक प्रमाणपत्र
1) जन्म प्रमाणपत्र – Birth certificate
2) शाळा सोडल्याचा दाखला – School Leaving Certificate
3) वयाचा पुरावा – Proof of age
C) पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड. PAN card, driving license, Aadhar card.
D) पत्त्याचा पुरावा जसे वीज बिल, मोबाईल बिल, पाणी बिल गॅस कनेक्शन Electricity bill, mobile bill, water bill, gas connection.
E) चालू असलेल्या बँक खात्याचे फोटो पासबुक Bank account photo passbook.
असे वरिल कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ( Ministry of Foreign Affairs) पासपोर्ट सुविधा गतिमान करण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज (online passport application) करण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (indian passport seva) ही प्रक्रिया नेमकी कशी आहे समजुन घेऊयात.
पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? How to apply for a passport online?
1) पासपोर्ट सेवेच्या https://passportindia.gov.in/ या वेबसाईटवर लॉग इन करा.
2) जर तुम्ही जुने वापरकर्ता असाल तर तुम्ही जुना लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करू शकता. परंतु, जर तुम्ही पहिल्यांदा वापर करत असाल, तर तुम्हाला नव्याने नोंदणी करून नवीन खाते तयार करावे लागेल.
3) वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर, ‘नवीन वापरकर्ता’ टॅब अंतर्गत ‘आता नोंदणी करा’ वर क्लिक करा.
4 )त्यानंतर वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द प्रविष्ट करा, सत्यापनासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘रजिस्टर’ वर क्लिक करा.
5) नोंदणीकृत लॉगिन आयडीसह पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलवर लॉग इन करा.
6) लॉगिन केल्यानंतर, दिलेल्या पर्यायांमधून निवडा आणि ‘फ्रेश पासपोर्ट / पासपोर्ट पुन्हा जारी’ या लिंकवर क्लिक करा.
7) अर्जामध्ये आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करण्यासाठी ‘ई-फॉर्म अपलोड करा’ या लिंकवर क्लिक करा.
8) नंतर ‘जतन केलेले/सबमिट केलेले अर्ज पहा’ स्क्रीनवर, भेटीचे वेळापत्रक देण्यासाठी ‘पे आणि शेड्यूल अपॉईंटमेंट’ या लिंकवर क्लिक करा.
9)शेवटी अर्ज पावतीची प्रिंटआउट घेण्यासाठी ‘प्रिंट अप्लिकेशन रसीद’ या लिंकवर क्लिक करा.
10) पावतीमध्ये अर्ज संदर्भ क्रमांक किंवा भेटीचा क्रमांक असतो जो भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवावा.
वरील प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली की आपली ऑनलाईन पासपोर्ट नोंदणी सुरळीत होईल. दरम्यान ऑनलाईन प्रक्रियेत काही अडचण आल्यास वेबसाईटवरील हेल्प सेंटरचीही आपण मदत घेऊ शकता. (indian passport seva)