Today Google 23rd birthday doodle | आज गुगलचा 23 वा वाढदिवस : जाणून घ्या वाढदिवसाचा थोडक्यात इतिहास !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Today Google 23rd birthday doodle | जगातील सर्वाधिक लोकांची पसंती असलेल्या गुगल सर्च इंजिन आज 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. गुगलने आज होमपेजवर त्याच्या वाढदिवसाचे गुगल डूडल (Google Doodle)  ठेवले आहे.

यापुर्वी गुगलने आपले वाढदिवस वेगवेगळ्या तारखांना जाहिर केले होते. सन 2005 मध्ये 07 सप्टेंबर ला गुगलने वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर 08 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर ला वाढदिवस साजरा केला होता. परंतु 27 सप्टेंबर या एकाच दिवशी सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक गुगल सर्च झाल्यापासून गुगलने 27 सप्टेंबर हाच दिवस वाढदिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

जगप्रसिद्ध गुगल कंपनीची स्थापना सन 1998 साली झाली. कॅलिफोर्नियातील स्टैनफोड विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या लैरी पेज आणि सर्गी ब्रिन (Larry Page and Sergey Brin) या दोन विद्यार्थ्यांनी केली होती. गुगल लाँच होण्यापूर्वी त्यांनी Backrub हे नाव दिलं होते. परंतु हे नाव बदलून गुगल हे नाव देण्यात आले.

गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. जगातील तब्बल 100 पेक्षा अधिक भाषेत गुगल सेवा पुरवते. भारतातील स्थानिक भाषांमध्येही गुगलकडून सेवा दिल्या जातात. गुगलवर आपल्या ग्राहकांना (युजर्स) सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सदैव तयार असते.

जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाई हे आहेत. ते भारतीय वंशाचे आहेत.

गुगल आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त गुगलने आकर्षक गुगल डुडल आपल्या होमपेजवर लावले आहे. गुगल डुडलमध्ये एक केक दाखवण्यात आला आहे. त्यात 23 हा आकडा देण्यात आला आहे. ज्यात ‘google’ या शब्दांतील ‘L’ या शब्दाच्या जागी मेणबत्ती दाखवली गेली आहे. गुगलने आजचा ॲनिमेटेड गुगल डुडल बनवले आहे.

 

web titel :Today Google 23rd birthday doodle