What is Digital virtual Cryptocurrency : बिटकॉईन संबंधीत 08 वादग्रस्त ॲप गुगलने हटवले !
Bitcoin (BTC) क्रिप्टो करन्सी म्हणजे काय ? चला तर मग समजुन घेऊयात सविस्तर
What is Digital virtual Cryptocurrency | जगात क्रिप्टोकरन्सीमध्ये रस दाखवणारांची संख्या वाढली आहे. क्रिप्टोकरन्सीचे वाढते मुल्य जगभरात चर्चेत आहे. यामुळे भारतासह जगभरात क्रिप्टोकरन्सीचे आकर्षण आहे. याचाच फायदा घेऊन हॅकर्सकडून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचेही प्रकार घडत आहेत. यासाठी हॅकर्सकडून मोबाईल ॲप्सचा वापर केला जात असल्याने गुगलने (Google deleted 8 dangerous apps) आठ वादग्रस्त ॲप प्ले-स्टोअरमधून हटवले आहेत.
सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोने (Trend Micro) केलेल्या विश्लेषणात जे क्रिप्टोकरन्सी मायनिंग अॅप्स म्हणून सादर करण्यात आले होते. त्यामध्ये, वापरकर्त्यांना गुंतवणुकीवर मोठा नफा मिळत असल्याचे सांगितले जात होते. तसेच 8 मॅलिशियस अॅप्स (8 Malicious Apps) जाहिरातींच्या बहाण्याने लोकांना फसवत होते, ही बाब समोर आली. त्यानंतर गुगलने आठ वादग्रस्त अॅप्स लगेच प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहेत (Google deleted 8 dangerous apps) त्या ॲपची माहिती जाणून घेण्याआधी आपण समजून घेऊयात क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? त्याचा जन्म कधी झाला ? जगात या करन्सीने का धुमाकूळ घातला आहे? त्याचे मुल्य काय? चला तर मग जाणून घेऊयात.. (What is Digital virtual Cryptocurrency)
क्रिप्टो करन्सी म्हणजे काय ? (What is cryptocurrency? )
क्रिप्टो करन्सी म्हणजे (digital cryptocurrency meaning) आभासी चलन (Cryptocurrency is a virtual currency) चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी म्हणजे हे चलन.भारतीय रुपया,अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखं हे चलनं नसतं. कोणत्याही देशाचं सरकार वा बँक हे चलन ‘छापत’ नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंग द्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. (This currency is generated through mining and these cryptocurrencies are transacted through blockchain) जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलनं आहेत तश्याप्रकारची ही अभासी करन्सी आहे. (What is Digital virtual Cryptocurrency )
क्रिप्टोकरन्सीचा जन्म कधी झाला ? ( When was cryptocurrency born?)
२००९ मध्ये सातोशी नाकामोतो (Satoshi Nakamoto Bitcoin) नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची Bitcoin (BTC) संकल्पना जन्माला घातली. आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाण घेवाणीसाठी ते वापरू शकता. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ Bitcoin (BTC) अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. (What is Digital virtual Cryptocurrency)
क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार कसे होतात ? (How are cryptocurrencies traded?)
आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे.(What is Digital virtual Cryptocurrency )
क्रिप्टोकरन्सीचे डोळे दिपवणारे मुल्य ? (value of Bitcoin cryptocurrency?)
‘बिटकॉइन’ Bitcoin (BTC) या आभासी चलनाचे मूल्य आकाशाला गवसणी घालत आहे. भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य 23 ऑगस्ट 2021 रोजी 37 लाख 23 हजार 952 इतके आहे. यात झपाट्याने वाढ होत आहे. अभासी चलनाच्या बाजारात जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत.(What is Digital virtual Cryptocurrency)
यामध्ये बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करतंय.यातली बिटकॉइन सर्वाधिक लोकप्रिय आहे. आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे. (The virtual currency market also has a variety of cryptocurrencies around the world, including Bitcoin, Lightcoin, Ripple, Etherium and ZCash. Facebook is also preparing to launch a cryptocurrency called Libra. Bitcoin is the most popular.)
भारतात क्रिप्टोकरन्सीला परवानगी आहे का ? (Is cryptocurrency allowed in India?
एप्रिल 2018 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. (Cryptocurrency in India) म्हणजे बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती. यावर इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने (Internet and Mobile Association of India) याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.त्यावर झालेल्या सुनावणीत निकाल देताना सुप्रीम कोर्टाने व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला परवानगी दिली.मार्च 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला होता. तेव्हापासून भारतात अभासी व्यवहार वेगाने होताना दिसत आहेत. (What is Digital virtual Cryptocurrency)
गुगलने अॅप्स हटवले पण तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ?
सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या अहवालानंतर गुगलने हे अॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहेत परंतु हे अॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल असू शकतील तर त्वरित डिलीट करण्याची गरज आहे. अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, किंवा तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.(What is Digital virtual Cryptocurrency)
8 धोकादायक अॅप्स गुगलने हटवले (Google deleted 8 dangerous apps)
1) BitFunds – Crypto Cloud Mining
2) Bitcoin Miner – Cloud Mining
3) Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
4) Crypto Holic – Bitcoin Cloud Mining
5) Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System
6) Bitcoin 2021
7) MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner
8) Ethereum (ETH) – Pool Mining Cloud
(This Article edit by sattar Shaikh, jamkhed Times)