जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जगप्रसिद्ध महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे हृदयविकाराने निधन झाले. वॉर्न यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. (Australia Cricket legend Shane Warne dies)
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर शेन वॉर्न यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. थायलंडमधील कोह सामुई येथे निधन झाले. शेन वॉर्न ला घरातच हृदयविकाराचा झटका आला होता. तो घरातच कोसळला होता.
त्याच्यावर वैद्यकीय कर्मचारी आणि स्टाफने घरातच उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही वाॅर्नला वाचवता आले नाही. शेन वॉर्न यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.