IND vs PAK Match T20 World Cup 2021 | T20 विश्वचषक स्पर्धा 2021 | कट्टर प्रतिस्पर्धी भारत VS पाकिस्तान आज आमने सामने | विश्वचषक कामगिरीचा थोडक्यात आढावा !
मुंबई वृत्तसंस्था : IND vs PAK match T20 World Cup 2021 यूएईमध्ये आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे.भारतीय संघ (Indian team) आज स्पर्धेची सुरूवात करणार आहे.
पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत भारत पहिली मॅच खेळेल.जागतिक क्रिकेट विश्वात भारत विरूध्द पाकिस्तान या (India VS Pakistan) सामन्याला मोठे महत्व असते. सामन्यापूर्वी दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली जाते.
भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशात सतत तणाव असतो.दोन्ही देशाचे संघ ऐकमेकांच्या देशात खेळताना दिसत नाहीत. या संघासाठी जागतिक स्पर्धा ही पर्वणी असते. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांविरुद्ध आज खेळताना दिसतील.
यूएईमध्ये आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहिला सामना होणार आहे.विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध आतापर्यंत शंभर टक्के निर्भेळ यश मिळविले आहे. भारतीय संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे.तसेच विश्वचषकाचा दावेदारीही समजला जात आहे.
टी-ट्वेंटी विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात भारताने पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा भारत पून्हा ‘बाजी’ मारणार का याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
भारत व पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाचा विश्वचषकातील इतिहास नेमका कसा आहे ? चला तर मग जाणून घेऊयात.(brief overview of India VS Pakistan World Cup performance)
२००७ विश्वचषक
२००७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने प्रथम फलंदाजी करत ९ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ७ गडी गमावून तितक्याच धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्याने हा सामना बॉल आउटमध्ये पोहोचला. भारताने हा सामना जिंकून टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय मिळविला. त्यानंतर दोन्ही संघ अंतिम सामन्यात पुन्हा समोरासमोर आले. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ गडी गमावून १५७ धावा बनवल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ १५२ धावांवर सर्वबाद झाला. भारताने पाकिस्तानवर विजय संपादन करत पहिला टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता.
२०१२ विश्वचषक
भारत आणि पाकिस्तानचे संघ थेट २०१२ च्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले. भारताने प्रथम शानदार गोलंदाजी करून पाकिस्तानला १२८ धावांवर रोखले. त्यानंतर दमदार फलंदाजी करून १७ व्या षटकात २ गडी गमावून विजय निश्चित केला.
२०१४ विश्वचषक
भारत आणि पाकिस्तानचा सामना २०१४ मध्ये पुन्हा एकदा झाला. यात भारताने विजयी परंपरा कायम राखली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघ ७ गडी गमावून १३० धावा करू शकला. भारताने तीन गडी गमावून १८.३ षटकात दिलेले आव्हान अगदी सहज पार केले.
२०१६ विश्वचषक
या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करताना अडखळले. पाकिस्तानी संघाने ५ गडी गमावून ११८ धावा करू शकला. भारताने हे लक्ष्य १५.५ षटकात ४ गडी गमावून सहज पार केले आणि विजयीरथ कायम ठेवला.