India’s meeting with the Taliban in doha | भारताची तालिबानसमवेत कतारमध्ये पार पडली बैठक

बैठकीत अनेक मुद्दे आले चर्चेत

 

India’s meeting with the Taliban in doha, Qatar | जामखेड टाईम्स वृत्तसेवा |अमेरिकेने (US) अफगाणिस्तानातून (Afghanistan) सैन्य माघारी घेताच तालीबानने (Taliban) अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. त्यानंतर जगात चिंता व्यक्त होत आहे. जगातील अनेक देश तालिबानच्या सरकारला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीत. (Many countries not support the Taliban government)

तालिबानच्या सक्रीयतेमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक देशांतील नागरिक अफगाणिस्तानात अडकून पडले आहे. भारताच्याही नागरिकांचा यात समावेश आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर भारतीय राजदूत (Indian Ambassador) व तालिबानी नेते (Taliban leaders) यांच्यात कतार (qatar doha) देशाची राजधानी असलेल्या दोहा (doha) येथे फेस टू फेस बैठक झाली.

या बैठकीत अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून तेथील भारतीयांच्या सुरक्षेचाही मुद्दा भारताने तालिबानसमोर उपस्थित केला आहे.भारताचे राजदूत दिपक मित्तल (Ambassador of India Deepak Mittal) यांची दोहा (doha) येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई (Abbas Stanekzai, the head of the Taliban’s political office) यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं (ministry of foreign affairs) दिली आहे.

तालिबानच्या अब्बास यांच्यासोबतच्या दोहा (doha) येथे झालेल्या बैठकीत अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यात तालिबानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत भारताची तालिबानसोबत चर्चा झाली आहे. यासोबतच अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यताचा मुद्दाही भारतानं चर्चेत उपस्थित केला.भारतानं उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक पद्धतीनं विचार करत असल्याची ग्वाही यावेळी तालिबाननं दिल्याचेही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. (ministry of foreign affairs)

अफगाणिस्तानातून आता अमेरिकन सैन्यानंही पूर्णपणे माघार घेतली आहे. (US troops have now completely withdrawn from Afghanistan.) त्यामुळे काबुल विमानतळावरही (Kabul Airport) आता तालिबान्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे भारतीय राजदूतांनी तालिबानसोबत केलेली ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे.

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासमोर अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तालिबाननं सत्ता काबिज केल्यानंतर भारत अफगाणिस्तानबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

भारतात केल्या गेलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत भारत चर्चा करणं कठीण असल्याचं बोललं जात होतं. पण गेल्या काही वर्षात भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेली हजारो कोटींची गुंतवणूक (Thousands of crores invested by India in Afghanistan) आणि तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत चर्चा करण्याची भूमिका केंद्र सरकार (Government of India) घेऊ शकतं अशीही शक्यता वर्तविण्यात येत होती.

याच पार्श्वभूमीवर भारतीय राजदूतांनी तालिबानसोबत दोहा (doha) येथे केलेली चर्चा याचाच प्रत्यय देणारी ठरली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत तालिबानसोबत चर्चेची तयारी ठेवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (India is expected to hold talks with the Taliban)

web title: India’s meeting with the Taliban in doha