New Zealand cricket team cancels Pakistan tour | न्यूझीलंडने दिला पाकिस्तानला दणका : सामने न खेळण्याचा निर्णय; न्यूझीलंड संघ मायदेशी परतणार
न्यूझीलंडच्या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ
लाहोर : वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या (Pakistan) दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand) सामना सुरू होण्याच्या काही वेळ आधी पाकिस्तानला मोठा दणका दिला. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. (New Zealand players refused to play match in Pakistan for security reasons) या निर्णयामुळे पाकिस्तान तोंडघशी पडले आहे. क्रिकेट वर्तुळातून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (New Zealand cricket team cancels Pakistan tour)
न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी सामने न्यूझीलंड संघ खेळणार होता. वनडे सामन्याच्या मालिकेची 17 रोजी सुरूवात होणार होती.पहिल्या सामन्याच्या टॉस होण्याच्या 20 मिनिटांआधी न्यूझीलंड संघाने खेळण्यास नकार दिल्याने हा सामना रद्द करण्यात आला. न्यूझीलंड संघाच्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. (New Zealand cricket team cancels Pakistan tour)
2009 साली लाहोर येथे श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय संघानी पाकिस्तानचा दौरा करणं सोडून दिलं होतं. पण मागील काही वर्षांमध्ये यात बदल झाला आणि पाकिस्तानात विदेशी संघ क्रिकेट खेळण्यास येऊ लागले.दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघानी नुकताच पाकिस्तानचा दौरा केला होता.
त्यानंतर न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. आजपासून न्यूझीलंडच्या दौऱ्यास सुरूवात होणार होती. पहिल्याच सामन्याच्या दिवशी न्यूझीलंडमधील सुरक्षा यंत्रणांनी संघाला सामना खेळण्यासाठी न जाण्याच्या सूचना देत सतर्क केले. ज्यानंतर संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला. (New Zealand cricket team cancels Pakistan tour) दरम्यान यामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठं नुकसान होणार आहे. न्यूझीलंड संघ आता मायदेशी परतणार आहे. (New Zealand team will return home)
न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर इंग्लंडचा (England) महिला आणि पुरुष संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी येणार होते. तब्बल 16 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानात दौऱ्यासाठी तयार झाला होता. टी20 विश्वचषकाआधी हा दौरा ठेवण्यात आला होता. पण आता या घटनेनंतर या दौऱ्यावरही रद्द होण्याची टांगती तलवार लटकत आहे. पुरुष आणि महिला संघ 2-2 टी-20 सामने खेळणार असून महिला 3 वनडे सामनेही खेळणार होते.
तसेच ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्याचं भविष्यही धोक्यात आलं आहे. या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी20 अशा सर्व प्रकारचे सामने खेळवण्यात येणार होते. ही मालिका फेब्रुवारी, मार्च 2022 दरम्यान खेळवली जाणार होती. ऑस्ट्रेलिया संघ जवळपास 24 वर्षांपासून पाकिस्तान दौऱ्यावर गेलेली नाही. मात्र न्यूझीलंडच्या निर्णयामुळे इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाच्या दौर्याबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. (England and Australia tour to Pakistan uncertain)
web title: New Zealand cricket team cancels Pakistan tour