जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Russia-Ukraine War News | रशिया – युक्रेन युध्दामुळे जग चिंतेत आहे. या युध्दामुळे गेल्या 10 दिवसांपासून युक्रेनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. युध्दग्रस्त भागात अजूनही शेकडो विद्यार्थी अडकून आहेत. परंतू जामखेड तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी रविवारी समोर आली आहे.
युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेले जामखेड तालुक्यातील दोन विद्यार्थी सुखरूपपणे मायदेशी परतले आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड टाईम्सशी बोलताना दिली. (Two students from Jamkhed returned safely to India from war-torn Ukraine)
चार महिन्यांपुर्वी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील चैतन्य वाल्मिक बिरंगळ (Chaitanya Valmik Birangal) व तरडगाव येथील ओमकार धनंजय ढाळे (Omkar Dhananjay Dhale) हे दोघे विद्यार्थी MBBS च्य शिक्षणासाठी युक्रेनला गेले होते. दोन्ही विद्यार्थी MBBS च्या पहिल्या वर्षासाठी युक्रेनमध्ये शिक्षण घेत होते.
मात्र युक्रेनवर रशियाने हल्ला केल्याने हे दोघे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. युक्रेनमध्ये युध्द सुरू झाल्याची बातमी जशी गावाकडे धडकली तशी दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या चिंता वाढल्या होत्या. आपली लेकरं कधी परतणार याकडे आई वडीलांच्या नजरा लागल्या होत्या.
जामखेड तालुक्यातील ओमकार व चैतन्य हे दोघे विद्यार्थी आपल्या इतर मित्रांसमवेत युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते.अखेर युध्दग्रस्त युक्रेनच्या शेजारील रोमानिया देशाच्या सीमेवर जाऊन ते दोघे पोहचले.
भारत सरकारने हाती घेतलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत दोघे विद्यार्थी आपल्या इतर सहकारी मित्रांसमवेत भारतात सुखरूप परतले आहेत. दोन्ही विद्यार्थी सुखरूप आहेत. आपली लेकरं मायदेशी परतल्याने दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
➡️ वरिल बातमीचे आणखीन सविस्तर अपडेट लवकरच दिले जातील, रोखठोक व विश्वसनीय बातम्यांसाठी आवर्जून वाचत रहा जामखेड टाईम्स