IPL 2024 news : दिल्ली कॅपिट्ल्स संघात एका तगड्या खेळाडूची एन्ट्री, तर वेगवान गोलंदाज Lungisani Ngidi आयपीएल 2024 मधून बाहेर !
Rishabh Pant IPL 2024 news : आयपीएल 17 व्या मोसमाला आता मोजून आठवडा बाकी राहिला आहे. आयपीएल 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडणार आहे .महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली असा हा हायव्होल्टेज सामना असणार आहे. या हंगामाआधी एक एक करुन खेळाडू टीमसोबत जोडले जात आहे. तर काही खेळाडूंनी दुखापतीमुळे तसेच वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. त्यात आता आणखीन एकाची भर पडली आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत हा अपघातानंतर पूर्णपणे फिट झाला आहे. आता तो पुन्हा एकदा आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पंतकडेच दिल्लीचं नेतृत्व असणार आहे. मात्र त्याआधी दिल्लीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिल्लीला आणखी एक मोठा झटका लागला आहे. हॅरी ब्रूक याने नुकतीच आयपीएलमधून माघार घेतली. त्यानंतर आता आणखीन एक खेळाडू खेळणार नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगीसनी न्गिडी आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. आयपीएलकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
लुंगीसनी न्गिडी दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. लुंगी हा आक्रमक आणि मॅचविनर गोलंदाज आहे. याच एन्गिडीने चेन्नईला 2 वेळा आयपीएल जिंकून देण्यात मोठं योगदान दिलं आहे. एन्गिडी 2022 मध्ये चेन्नईतून दिल्ली टीममध्ये आला होता.लुंगीसनी न्गिडीने आयपीएलच्या 14 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.
दिल्लीला मोठा धक्का
एन्गिडीच्या जागी दिल्ली टीममध्ये ऑस्ट्रेलियाचा युवा आक्रमक फलंदाज जेक फ्रेजर मॅकगर्क याचा समावेश करण्यात आला आहे. जेकने आतापर्यंत 2 वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच त्याने लिस्ट ए क्रिकेटमधील 18 डावांमध्ये 525 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक आहे. जेक याने लिस्ट ए क्रिकेटमधील ठोकलेलं एकमेव शतक हे ऐतिहासिक असं आहे. जेकने प्रोफेशनल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक केलं. जेकने अवघ्या 29 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. जेकने गेल्या वर्षी मार्श कपमध्ये ही कामगिरी केली होती. जेक आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र तो आता दिल्लीकडून खेळणार आहे.
आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्स टीम | ऋषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, पृथ्वी शॉ, खलील अहमद, ललित यादव, प्रवीण दुबे, मुकेश कुमार, यश धुल, विक्की ओस्त्वाल, अभिषेक पोरेल, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिख दार, सुमित कुमार, स्वास्तिक चिकारा, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिचर्ड नॉर्ट्जे, जैक फ्रेजर मैकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, झाय रिचर्डसन आणि शाई होप.