मोठी बातमी : जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्याविरोधात भाजपचे 14 गंभीर आरोप, तडकाफडकी बदली करून मनमानी कारभाराची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी भाजप झाली आक्रमक !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या मनमानी कारभारावर आक्षेप घेत भाजपने 14 गंभीर आरोप केले आहेत. मिनीनाथ दंडवते यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी आणि दंडवते यांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी जामखेड शहर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या या आरोपांमुळे जामखेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष बिभीषण धनवटे आणि नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांची आज 30 रोजी जामखेड तहसिल कार्यालयात भेट घेतली आणि जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या विरोधात तक्रारी निवेदन दिले.
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिनीनाथ दंडवते हे जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून जुन 2020 पासून कार्यरत आहेत. तेव्हापासून ते शहरात व न.प. अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मनमानी कारभार व एकाधिकार शाही पद्धतीने कामकाज करत आहेत तसेच नागरिकांच्या कामकाजा संदर्भात भेटीसाठी उपलब्ध नसतात, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. तसेच निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या 14 मागण्यांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. यामुळे नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपने मुख्याधिकारी यांच्यावर केलेले आरोप खालील प्रमाणे
1. प्रशासक काळातील सर्व खर्चाची व अदा केलेल्या सर्व बिलांची सखोल चौकशी करण्यात यावी.
2. जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुक प्रक्रिया गुप्त असताना राजकीय दबावाखाली प्रभाग रचना व मतदारयाद्या चुकीच्या पद्धतीने केल्या.
3. मागील दोन वर्षापासुन दैनंदिन व आठवडे बाजार व्यावसाय कर लिलाव प्रक्रिया झालेली नसून त्याची वसूली मात्र सक्तीने चालू असून त्यामध्ये गैरव्यवहा चालु आहे.
4. जिओ कंपनीच्या शहरात विना परवाना बसवन्यात आलेल्या पोलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला
5. नगर परिषद अंतर्गत कामामध्ये व टेंडर पद्धती मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे.
6. जागेच्या व घरांच्या नोंदीमध्ये फेरफार करून आर्थिक गैरव्यवहार चालु आहे. 7. सार्वजनिक शौचालय दुरुस्ती प्रक्रिया मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे..
8. मोकाट वराह पकडन्याच्या निविदा प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे.
9. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये जातीय तनाव निर्माण करण्याच काम केल आहे. आनाधिकृत बांधकामांना शास्ती कर न आकारता नोदी लावल्या आहेत.
11. कर्मचारी वर्गावर दबाव टाकुन चुकीचे कामे करून घेण्यात येतात, ज्या कर्मच्यार्यानी चुकेचे कामे केले नाही त्यांना निलंबीत केले आहे.
12. नागरिकांना भेटीसाठी वेळ देऊन भेटत नाहीत व व्यक्ती पाहून काम करतात.
13. लॉकडाउन नियमांचा गैरफायदा घेत मुख्य अधिकारी यांनी कर्मचार्यान मार्फत व्यापार्याना जाणीव पूर्वक त्रास देऊन चुकीच्या पद्धतीने आर्थीक वसूली केली.
14. डी.पी.प्लॅन ( शहर विकास आराखडा) मध्ये सर्वेअर यांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केलाआहे, त्यामुळे जामखेड नगरपरिषदेचा डी.पी प्लॅन वदाच्या भोवर्यात सापडला आहे.
भाजपने जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनावर वरिल 14 मागण्या केल्या आहेत. या निवेदनावर भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, नगरसेवक अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, गौतम उत्तेकर, तात्याराम पोकळे, मोहन (मामा) गडदे, सोमनाथ राळेभात, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, डाॅ अल्ताफ शेख, ॲड प्रविण सानप, नितीन धनवडे, आप्पा ढगे, पोपट (नाना) राळेभात, अभिजित राळेभात, डाॅ विठ्ठल राळेभात, प्रविण होळकर, असिफ कमाल, योगेश शिंदे, डाॅ नितीन अनुभवले, प्रकाश राऊत, राहूल राऊत, शिवकुमार डोंगरे, गोरख घनवट, श्रीराम डोके, विठ्ठल देवकाते, आण्णासाहेब वायसे, महेश मासाळ, सुरेश भोसले, विनोद बोराटे, संतोष गव्हाळे, सलिम तांबोळी, उध्दव हुलगुंडे, सुनिल यादव सह आदी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. हे सर्व पदाधिकारी निवेदनावर देताना उपस्थित होते.