जामखेड : शिक्षक आहेत म्हणून आपण आहोत ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असली पाहिजे – डीवायएसपी आण्णासाहेब जाधव
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अभ्यासक्रमा व्यतिरिक्त एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात कालिका पोदार लर्न स्कूलकडून जे योगदान दिले जात ते कौतुकास्पद आहे. आपली संस्कृती आणि संस्कार यावर पालकांनी जास्तीत जास्त भर द्यावा. आपली मुलं संस्कारक्षम घडवण्यासाठी पालकांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे आचरण करणे आवश्यक आहे. शिक्षक आहेत म्हणून आपण आहोत ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनात बाळगली पाहिजे. शालेय स्तरावर या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांची गोडी विद्यार्थ्यांना लावली जात आहे ही बाब कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार डिवायएसपी आण्णासाहेब जाधव यांनी काढले.
जामखेड शहरापासून जवळच असलेल्या कालिका पोदार लर्न स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी डिवायएसपी आण्णासाहेब जाधव बोलत होते.
यावेळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोदार इंटरनॅशनल स्कुल बीडच्या प्राचार्या प्रतिक्षा जोहरी, कालिका पोदार लर्न स्कूल केजचे प्राचार्य योगेश इरतकर, पोदार लर्न स्कूल उमरगाचे संस्थापक विशाल कोकरे आणि आरगडे सर, स्पोर्ट हेड ऑफ डिपार्टमेंट जैन इंटरनॅशनल स्कूल औरंगाबादचे योगेश कुलकर्णी, कालिका पोदार लर्न स्कूल (CBSE) जामखेडचे संस्थापक उमाकांत अंदुरे, नितिन तवटे, प्रशांत कानडे, निलेश तवटे, सागर अंदुरे, प्राचार्य प्रशांत जोशी सह आदी उपस्थित होते.
जामखेड येथील कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. वसुधैव कुटुम्बकम या थीमवर यंदाचा कार्यक्रम संपन्न झाला.कालिका पोदार लर्न स्कूलचे संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी बहारदार गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी शाळेत संपुर्ण वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्राचार्य प्रशांत जोशी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.वसुधैव कुटुम्बकम ही संकल्पना विद्यार्थ्यांनी विविध नृत्यविष्कारातून प्रतिबिंबित केले.यातून मानवतेचे दर्शन घडले. पोद्दार जम्बो किडच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करत आपली चुणूक दाखविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि.रुद्राक्ष बांगर, चि.ओम गर्जे, चि.कुशल साबळे, कु.खुशी गंडाळ, कु.तृप्ती डोके, कु.गार्गी अवसरे कु. वृषाली जाधवर,कु. प्राजक्ता ढगे, चि. स्वराज अष्टेकर,चि.यश गवळी,कु. प्रियल बोथरा, कु.सिद्धी मुरकुटे, कु.शिवानी पोटे,कु.लब्धी फिरोदिया,कु.श्रेया कार्ले, या विद्यार्थ्यांनी केले.