अखेर मुस्लिम समाजाने पाहिलेलं ‘ते’ स्वप्न आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले पुर्ण !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड शहरातील मुस्लिम समाजासाठी शादीखाना असावा, अशी  मागणी सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारला जामखेड शहरातील मुस्लिम समाजाला न्याय देता आला नाही. महाविकास आघाडी सरकारला तीन वर्षांत जे जमले नाही ते काम आमदार प्रा.राम शिंदे यांनी करून दाखवले. महायुती सरकारच्या माध्यमांतून मुस्लिम समाजाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावत मुस्लिम बांधवांना न्याय मिळवून दिला. जामखेड शहरात शादीखाना व ईदगाह मैदान सुशोभीकरण कामासाठी 50 लाखांचा निधी मंजूर केला. ‘अपना तो अपना होता है’ अशी चर्चा आता जामखेडमधील मुस्लिम बांधवांमध्ये रंगली आहे.

Finally, MLA Prof. Ram Shinde has fulfilled that dream seen by the Muslim community, 50 lakhs sanctioned for Shadikhana and Eidgah grounds beautification

जामखेड शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या समाजातील गोरगरिबांना कौटुंबिक कार्यक्रमांसाठी शादीखाना असावा अशी मागणी होत होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर सदरची मागणी मार्गी लागावी यासाठी जामखेड शहरातील मुस्लिम बांधवांनी सातत्याने मागणी केली होती. परंतू महाविकास आघाडी सरकारने आपल्या सत्ताकाळात जामखेड शहरातील मुस्लिम बांधवांना न्याय दिला नाही.

मात्र, स्थानिक भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे हे विधानपरिषद सदस्य झाल्यानंतर मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी जामखेड शहरात शादीखाना व्हावा अशी मागणी त्यांच्याकडे केली. आमदार प्रा राम शिंदे यांनी या मागणीची तातडीने दखल घेतली व ही मागणी मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमांतून आमदार प्रा.राम शिंदे यांनी मुस्लिम बांधवांसाठी जामखेड शहरात शादीखाना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. शादीखाना व ईदगाह मैदान सुशोभीकरण हे दोन्ही काम मार्गी लावण्यासाठी त्यांनी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. महायुती सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत सुमारे 50 लाख रूपयांचा भरघोस निधी मंजूर केला.

जामखेड शहरातील मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना असावा हे मुस्लिम समाजाने पाहिलेलं स्वप्न आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास आले आहे. शादीखाना व ईदगाह मैदान सुशोभीकरण या कामांसाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी भरघोस असा 50 लाख रूपयांचा निधी मंजुर केल्याबद्दल समस्त मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातही जामखेड शहरातील ईदगाह मैदानाच्या संरक्षक भिंतीसाठी भरीव निधी मंजुर केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार प्रा.राम शिंदे यांनी मुस्लिम बांधवांसाठी भरीव निधी मंजुर केला आहे. आमदार प्रा.राम शिंदे हे सातत्याने सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतात हेच यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.आमदार प्रा राम शिंदे यांनी मुस्लिम समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा शादीखान्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुस्लिम समाजाकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.