जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू दडले आहेत. त्यामुळे जामखेडमधील तरूण – तरूणी विविध खेळांमध्ये सातत्याने मोठे यश मिळवत आहेत. या यशातून जामखेडचे नाव राज्यात झळकत आहे. राज्यात जामखेडची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने सातत्याने विवध उपक्रम राबवले जात आहेत, याचाच भाग म्हणून राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेतील विजेत्यांंचा गौरव करण्यात आला, असे प्रतिपादन ऑक्सफोर्ड शाळेचे अध्यक्ष प्रा कैलास माने यांनी केले.
कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या 26 व्या राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत जामखेड येथील 4 मुलींनी सुवर्ण, कांस्य, रौप्य या पदकांंची लयलूट करत यशाची पताका फडकावली. याबद्दल ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने विजेत्या तरूणींचा गौरव करण्यात आला.
स्टेट कोच ईशा पारखे हिच्या मार्गदर्शनाखाली जामखेड येथील दिक्षा पंडित,कोमल डोकडे, सुवर्णा भैसडे, मोहिनी शिरगिरे या तरूणींंनी कोल्हापूर येथे पार पडलेल्या 26 व्या राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल जामखेड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने चौघा तरूणींचा सन्मानचिन्ह देऊन आज गौरव करण्यात आला.
यावेळी शाळेचे अध्यक्ष प्रा कैलास माने, शाळेच्या सचिव वर्षा कैलास माने, प्राचार्य अभिजित उगले, संगणक शिक्षक शिवमुनी बांगर, उषा मिसाळ, पुजा घंटे, उर्मिला लटपटे, सबिया खान, तेहरिन पठाण, राधा बांगर, सह आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.
ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचे प्राचार्य अभिजित उगले यावेळी बोलताना म्हणाले की, जामखेड तालुक्यातील तरूणींनी थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत मिळवलेले यश जामखेडकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. जामखेडचे नाव राज्यात उंचावणाऱ्या खेळाडूंचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. भविष्यातही या खेळाडूंनी मोठे यश मिळवावे असे अवाहन उगले यांनी केले.
26 व्या राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेतील विजेते खेळाडू खालील प्रमाणे
कोमल डोकडे – सुवर्ण पदक
सुवर्णा भैसडे – कांस्य पदक
मोहिनी शिरगिरे – कांस्य
दिक्षा पंडित – रौप्य
ईशा पारखे – स्टेट कोच