मेंटल, फिजिकल आणि काॅम्पेटेटिव्ह फिटनेस असेल तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही – लक्ष्मीकांत खिची, पोदार लर्न स्कूलमध्ये दोन दिवशीय क्रिडा दिन मोठ्या उत्साहात साजरा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। विद्यार्थी जीवनात तुमची खरी मालमत्ता तुमचे शिक्षण आणि वेगवेगळ्या ॲक्टीव्हिटीजमध्ये पुढे जाणं हे होय, असे सांगत ज्या खेळाडूकडे तग धरण्याची क्षमता, सामर्थ्य, सहनशक्ती आणि लवचिकता आहे, तोच कुठल्याही खेळावर प्रभुत्व मिळवू शकतो, तुमच्यामध्ये एवढे कलागुण पाहिजेत की, तुमच्या कलागुणांना सर्वांनी सलाम केला पाहिजे, तुमच्यामध्ये जर कलागुण नसतील तर तुुमचा पैसा काही कामाचा नाही,असे प्रतिपादन अर्चरी (धनुर्विद्या) संघटनेचे राजाध्यक्ष लक्ष्मीकांत खिची यांनी केले.
जामखेड येथील कालिका पोदार लर्न स्कुल आणि पोदार जंबो किड्समध्ये दोन दिवशीय वार्षिक क्रिडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमात लक्ष्मीकांत खिची बोलत होते. यावेळी कालिका पोदार लर्न स्कुलचे संचालक सागर अंदुरे, निलेश तवटे, नितीन तवटे, प्रिन्सिपल प्रशांत जोशी, योगेश कुलकर्णी, योगेश ईरतकर, मनोराज मडीलगेकर,पोदार जंबो किड्सच्या प्रिन्सिपल लीना विश्वकर्मा सह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना लक्ष्मीकांत खिची म्हणाले की, मेंटल, फिजिकल आणि काॅम्पेटेटिव्ह फिटनेस म्हणजे फोर्स होय. मेंटल फिटनेस म्हणजे जो खेळ तुम्ही शिकत आहात त्याचे नियम तुम्हाला माहित पाहिजे, फिजिकल फिटनेस म्हणजे त्या खेळाला लागणारा बलोपासना अर्थात शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असते.विद्यार्थी जीवनात कलाकौशल्य आत्मसात करणारे विद्यार्थी आयुष्यात मोठी प्रगती करतात.
लक्ष्मीकांत खिची पुढे म्हणाले, मेंटल, फिजिकल आणि काॅम्पेटेटिव्ह फिटनेस असेल तर तुम्हाला खेळातून कोणीच मागे करणार नाही. खेळ आणि शिक्षण यात जर बरोबरीने काम केलं तर तुम्हाला मोठे अधिकारी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, कारण माझे 1800 विद्यार्थी स्पोर्ट्स कोट्यातून विविध पदांवर कार्यरत आहेत.त्यामुळे शिक्षणाबरोबर खेळातही प्राविण्य संपादित करा,असे अवाहन लक्ष्मीकांत खिची यांनी केले.
दरम्यान कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये आयोजित दोन दिवशीय वार्षिक क्रिडा महोत्सवात पोदार जंबो किड्सच्या विद्यार्थ्यांनी सिंगल रेस,झेब्रा क्रोशिंग, airoplane puzzle, सेल प्लेन रेस रन to हेल्प हॉर्स इंजिन तसेच पालकांची देखील रेस व इतर खेळ घेण्यात आले.यावर्षी जंबो ऑन व्हील अशी स्पोर्ट डेची थीम होती. ही थीम आमच्या मुलांना विविध प्रॉप्स आणि पोशाख वापरून वाहतुकीच्या विविध पद्धतींबद्दल चांगल्या प्रकारे समजून देण्यासाठी निवडली गेली होती.स्पोर्ट्स डे उपक्रमांमध्ये खेळांचा उपयोग केवळ शारीरिकच नव्हे तर मुलांच्या संज्ञानात्मक आणि सामाजिक विकासासाठी देखील केला जातो, असे संचालक सागर अंदुरे यावेळी बोलताना म्हणाले.
सर्वच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात हिरिरीने सहभाग घेतला. विविध खेळात नैपुन्य दाखवून चारही हाउसने चुरसीची लढाई दिली.यामध्ये तिसरा क्रमांक मिळवला तो वेंटस हाऊसने ,दुसरा क्रमांक इगनीस हाऊस आणि टेरा हाऊस यामध्ये विभागून मिळाला आणि पहिला क्रमांकाचा व मानाच्या ट्रॉफीचा सन्मान मिळाला तो एक्वा हाऊसला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या पालकांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांना लाजवेल अशी चुरशीची लढाई देऊन यश संपादन केले. विजेत्या पालकांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन सन्मानित करण्यात आले.दोन दिवस चाललेल्या क्रिडा महोत्सवात पालकांनी मोठा सहभाग नोंदवला. दोन दिवशीय कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी मोठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्ती लोहार व ज्योती कनका यांनी केले.
कोण आहेत लक्ष्मीकांत खिची ?
कालिका पोदार लर्न स्कूलने यंदा साजरा केलेल्या दोन दिवशीय क्रिडा कार्यक्रमासाठी औरंगाबादच्या लक्ष्मीकांत खिची यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित केले होते. लक्ष्मीकांत खिची हे झी अनन्या पूरस्कार प्राप्त आहेत. तसेच ते अर्चरी (धनुर्विद्या) या खेळाच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी ज्यूडो, कराटे, कुंगफू, अर्चरी, अकेरी, स्वयंसिद्धा, या खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे.ते विविध खेळांचे राष्ट्रीय पंच आहेत. योगशास्रातील हटयोग आचार्य हि पदवी सुध्दा त्यांनी संपादन केली आहे.