जामखेड नगरपरिषदेत घरकुलांचा निधी पडून (In Jamkhed Municipal Council, the funds of the households fell)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड नगरपरिषदेत घरकुलांसाठी निधी पडून असून लाभार्थ्यांनी बांधकाम परवाने घेऊन तातडीने काम सुरू करावे असे अवाहन जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.

जामखेडनगर परिषदेस प्रधानमंत्री आवास योजना “सर्वांसाठी घरे 2020 BLC घटक क्रमांक चार अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना 933 घरकुलांचा प्रकल्प मंजूर आहे. 933 पैकी 630 घरकुलांना बांधकाम परवानगी  देण्यात आली आहे. त्यापैकी 360 लाभार्थ्यांनी काम सुरू केलेले आहे. अत्तापर्यं 140 घरकुले पूर्ण झाली आहेत. अन्य घरकुले बांधकामाच्या विविध टप्प्यावर आहेत. एका घरकुलासाठी एकूण दोन लाख 50 हजार रुपये इतके अनुदान मंजुर आहे.


जामखेड नगरपरिषदेकडे घरकुलासाठी निधी उपलब्ध असून उर्वरित लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना घ्यावा. त्याचप्रमाणे बांधकाम परवाना प्राप्त लाभार्थ्यांनी तातडीने घरकुलांचेकाम सुरू करावे. विविध टप्प्यांवरील बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ तीन दिवसात अनुदान खात्यात जमा केली जाते तरी घरकुल योजनेचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. लाभार्थ्यांना माफक दरात  बांधकामाचा आराखडा तयार करून देण्यासाठी नगरपरिषदेने तीन वास्तुविशारदांची निवड केलेली आहे. तरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बांधकाम परवानगी घ्यावी व घरकुल बांधकाम पूर्ण करावेत असे आवाहन जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.