जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने हर घर तिरंगा मोहिम यशस्वी करण्यासाठी जामखेड नगरपरिषद सरसावली आहे. जामखेड नगरपरिषदेच्या वतीने जामखेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली आहे.
जामखेड नगरपरिषदेकडुन दि ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जामखेड शहरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. यामध्ये विशेष सभेचे आयोजन करुन आजादी का आमृत महोत्सव या विषयावर चर्चा व स्वराज्य महोत्सव तसेच हरघर झेंडा उपक्रमाची माहिती देण्यात आली.
शालेय विद्यार्थींसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वृक्ष लागवड करण्यासाठी रोपे खरेदी करण्यात आले आहेत. तसेच चित्र रथ तयार करुन याद्वारे शहरात जनजागृती करण्यात येत आहे.
सध्या सोशल मिडीयाचा जमाना आसल्याने त्याद्वारे प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रचार प्रसिद्ध करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थींना नगरपरिषदेकडून पर्यावरण शपथ व संविधान शपथ देण्यात आली.
तसेच जामखेड शहरात स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थीं, शिक्षक, प्रशासकीय कार्यालयांचे आधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून जामखेड शहरातुन प्रचार रॅली काढण्यात आली होती.
जामखेड शहरात पाच हजार पेक्षा अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार, त्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला पाठबळ देऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा साजरा करावा असे अवाहन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.