जामखेड : तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, कृषि विभाग, बाजार समितीत 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जामखेड तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सायली सोळंके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
जामखेड तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सायली सोळंके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, तसेच सामाजिक- राजकीय पक्षांचे नेते, माजी सैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, पोलिस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, निवासी नायब तहसीलदार मनोज भोसेकर,महेश अनारसे,डॉ वाघमारे, सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जामखेड तालुका पंचायत समितीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरुमकर, विस्तार अधिकारी कैलास खैरे, सिध्दनाथ भजनावळे, बाप्पुराव माने, उप अभियंता विठ्ठल माने, पशुधन विकास अधिकारी डाॅ घोडके, तालुका आरोग्य अधिकारी हनुमान पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर सह आदी मान्यवर व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड तालुका कृषि विभागात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास कृषि विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड पोलिस स्टेशनमध्येही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस हवालदार संजय लाटे, संजय लोखडे, पोलिस नाईक अविनाशढेरे, अजय साठे, कोपणर, भागवत, कुरेशी,परदेशी, जाधव, मांडगे, अमोल आजबे, घोळवे, मपो कॉ भुंबे, दहिरे , धनवडे, धांडे सहभागी होते. तसेच निवृत्त अंमलदार हेही यावेळी उपस्थित होते.
जामखेड बाजार समितीत सभापती पै शरद दादा कार्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर खर्डा मार्केट यार्डात बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय तसेच सर्व.शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावोगावी विद्यार्थ्यांनी प्रभात फेऱ्या काढत देशभक्तीचा गजर केला. भारत माता की जय, वंद मातरम, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी वातावरणात जोश भरला होता.