जामखेड : राज्यस्तरीय वुशु स्पर्धेत अदित्य जायभाय व श्रेयस वराटची दमदार कामगिरी; पटकावले सुवर्ण व रौप्य पदके !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अमरावती येथे ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अहमदनगर जिल्हा संघाने सहभाग घेतला होता. या संघात जामखेडमधील आठ खेळाडूंचा सहभाग होता. त्यातील अदित्य जायभाय व श्रेयस वराट या दोघांनी नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
राज्यस्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धेच्या ज्युनियर गटात अदित्य आजिनाथ जायभाय याने सुवर्ण पदक तर सब-ज्युनियर गटामध्ये श्रेयस सुदाम वराट याने रौप्य पदकाची कमाई केली.या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या अदित्य जायभायची राष्ट्रीय ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
दोन्ही यशस्वी खेळाडूंचे आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे, राज्य संघटनेचे सचिव सोपान कटके सर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, माजी जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश काका देशमुख, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, साकेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.