जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धेत जामखेड शहरातील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल शाळेच्या सर्व यशस्वी खेळाडूंचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
जामखेड तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धा नागेश विद्यालयात संपन्न झाल्या. 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मोठे यश संपादन केले. यामध्ये रिले क्रिडा स्पर्धेत हितेश शास्त्रकार, ओम गांधी, शुभम डिसले, रूद्राक्ष कदम आणि वेदांत लोहकरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच हितेश शास्त्रकार या विद्यार्थ्याने 100 मिटर रनिंग मध्ये तिसरा क्रमांक व 200 मि रनिंग मध्ये दूसरा क्रमांक पटकाविला. गोळाफेक मध्ये शुभम डिसले या विद्यार्थ्याने दूसरा क्रमांक मिळवला. तसेच थाळी फेक स्पर्धेत पृथ्वीराज डोके याने दूसरा क्रमांक मिळविला.तिहेरी उडी स्पर्धेत यशराज हळनावर याने प्रथम क्रमांक पटकाविला.
मुलींच्या गटात गोळा फेक मध्ये प्राची पवार हिने दूसरा क्रमांक व हिंदवी राळेभात हिने तिसरा क्रमांक मिळविला आणि थाळी फेक मध्ये साक्षी लोहकरे हिने दूसरा क्रमांक व हिंदवी राळेभात हिने तिसरा क्रमांक मिळविला.
जामखेड तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धेत ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या मुली आणि मुलांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या वतीने आज यशस्वी सर्व खेळाडू आणि क्रीडा शिक्षक सुभाष सर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा कैलास माने सर, संस्थापिका वर्षा कैलास माने, जाकीर शेख सर, प्राचार्य अभिजीत उगले व शाळेचे सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. शाळेकडून झालेल्या सन्मानाने विद्यार्थी भारावून गेले होते.
यावेळी जाकीर शेख सर यांनी पावसाळी क्रिडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे कौतूक केले.ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचे शिक्षक आणि संस्थाचालक विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतूक केले. विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडणार्या खेळात मेहनत घ्यावी. मोठे यश मिळवावे. शाळा आणि जामखेडचे नाव राज्यासह देशपातळीवर झळकावे, असे अवाहन शेख सर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.