जामखेड : माझ्या लाडक्या बहिणींनो फक्त एक फोन करा, तुमचा हा ‘रामभाऊ’ सख्खा भावासारखा तुमच्या मदतीला धावून येईल – आमदार प्रा.राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेतून आपल्या मतदारसंघातील 94 हजार 592 बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिला राहिल्या आहेत त्यांनाही याचा लाभ दिला जाणार आहे, असे सांगत माझ्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्हाला कसलीही अडचण येऊ द्या, संकट येऊ द्या, तेव्हा फक्त एक फोन करा, तुमचा हा ‘रामभाऊ’ तुमचा ‘सख्खा भाऊ’ म्हणून सदैव तुमच्या मदतीला धावून येईल. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका, असा विश्वास हजारो महिला भगिनींना आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेडमध्ये आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात बोलताना दिला.

My dear sisters, just make a phone call, your 'Ram Bhau' will come to your aid like a real brother - MLA Prof. Ram Shinde

जामखेड शहरातील विठाई लाॅन्स येथे आमदार प्रा राम शिंदे व महायुतीच्या वतीने ३० ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार प्रा.राम शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे ह्या होत्या.रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो माता भगिनींनी लाडक्या रामभाऊला राख्या बांधत हा सोहळा साजरा केला. रक्षाबंधन सोहळ्यास जामखेड शहरातील महिला भगिनींनी तुफान प्रतिसाद दिला. लाडक्या बहिणींचे अभूतपूर्व प्रेम पाहून आमदार प्रा राम शिंदे हे भारावून गेले होते. लाडक्या बहिणी रामभाऊंच्या पाठीशी एकवटल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

My dear sisters, just make a phone call, your 'Ram Bhau' will come to your aid like a real brother - MLA Prof. Ram Shinde

विरोधकांनी जामखेड शहरात स्मशानभूमी बांधली तर सगळ्या गावाची वर्गणी घेतली. पण हा राम शिंदे गेल्या 25 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. कुणाच्या दारात वर्गणी मागायला गेलो नाही. बळजबरीने कोणाकडून वसुलीही केली नाही. कारण भूमिपुत्राला भूमिपुत्राची भूमिका घ्यावी लागते. असे म्हणत सध्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे लोकांच्या मनात काहीतरी घालायचे उद्योग सुरु आहेत असा टोला यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला.

My dear sisters, just make a phone call, your 'Ram Bhau' will come to your aid like a real brother - MLA Prof. Ram Shinde

आमदार शिंदे पुढे म्हणाले की, महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली, मात्र सावत्र भाऊ म्हणतात की, पैसे शिल्लक आहेत का ? बजेटला तरतुद केलीय का ? योजना चालू राहणार आहे का ? पण तुमच्या लाडक्या भावांनी (मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री) सांगितलयं की, पंधराशेची ही योजना तीन हजारापर्यंत घेऊन जाऊ आणि सावत्र भाऊ म्हणतात की आम्ही कोर्टात जाऊ, विरोधक लाडकी बहिण योजनेच्या माध्यमांतून राज्यातील तमाम बहिणींच्या विरोधात बोलत आहेत त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी आता विरोधकांचा कायमचा बंदोबस्त करावा, असे अवाहन त्यांनी यावेळी केले.

My dear sisters, just make a phone call, your 'Ram Bhau' will come to your aid like a real brother - MLA Prof. Ram Shinde

शिंदे पुढे म्हणाले की, ओढून ताणून लाडका भाऊ आणि लाडकी बहिण होत नाही, त्याला मनातून असावं लागतं, ध्यानात असावं लागतं, जीवापाड प्रेम करावं लागतं, तेव्हा बहिण आणि भाऊ होतो,  म्हणूनच विधानपरिषदेचा आमदार झाल्याबरोबर जामखेड शहर पाणी योजनेचं पहिलं काम मार्गी लावलं तर 80 कोटी रूपये खर्चाची जामखेड शहर भुयारी गटार योजना मंजुर करून आणली. सख्या भावाने मंजुर केलेल्या या योजनेचे नारळ सावत्र भाऊ फोडतो आहे, असे म्हणत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला.

My dear sisters, just make a phone call, your 'Ram Bhau' will come to your aid like a real brother - MLA Prof. Ram Shinde

शिंदे म्हणाले की, ज्यांनी तुम्हाला या मतदारसंघात आणलं, निवडून दिलं त्यांनाच तुम्ही सुपारीबाज, छत्र्या, बेडूक, असे म्हणता, आता ही कोणती उपरती आहे ? असं कधीच नसतं, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसराच एक बोर्ड आलाय, लोकं म्हणली आम्ही तुम्हाला आमदारकी दिली आम्हाला काय मिळालं ? असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरू असलेल्या बॅनरबाजीवर भाष्य केले. लोकांनी तुमचा भुलभुलैय्या ओळखला आहे. आता तुम्हाला मतदारसंघात जास्त काळ शिरकाव आणि टिकाव शक्य नाही, असे म्हणत शिंदे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, 31 जुलै अखेर एमआयडीसी पाटेगावात होणार असा दावा विरोधकांकडून केला जात होता, त्याच्या बातम्याही छापुन आल्या. पण आता पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की, 31 जुलैला जी एमआयडीसी होणार होती त्याचं काय झालं ? हा प्रश्न त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. मी सभापती होणार आहे अश्या वावड्या उठवल्या गेल्या,पण येणाऱ्या कालखंडात माझ्या लाडक्या बहिणींना मला मत देण्याची संधी मात्र मी निर्माण करून देणार आहे, असे म्हणत शिंदे यांनी आपणच विधानसभेचा उमेदवार आहोत हे पुन्हा एकदा घोषित केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष संजीवनीताई पाटील, कमलताई राळेभात, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अर्चना राळेभात, मनिषा मोहळकर, प्रांजल चिंतामणी, माजी नगराध्यक्ष अर्चना राळेभात, संगीता पारे, सुनिता बारवकर, मुक्ताताई गोपाळघरे, सविता सानप, स्वाती यादव, यास्मिन कुरेशी, शाहजान खान, मंजुषा जोकारे, अश्विनी दळवी, वर्षा अंधारे, मनिषा वडे, प्रतिभा रेणूरकर, उज्वला राळेभात, आशाताई वाघ, सोनाली कर्डिले, प्रियंका शेलार, सह आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मतदारसंघातील सर्व महिलांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहावे – रक्षाताई खडसे

“लाडकी बहिण योजना जेव्हा सुरू झाली, तेव्हा सगळ्यात आधी आमदार रोहित पवारांनी योजनेचे बॅनर मतदारसंघात लावले. एका बाजूला तुम्ही बॅनर लावतात, लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्या म्हणता अन् दुसरीकडे तुम्ही कोर्टात जाता, योजनेवर, महिलांवर व सरकारवर टीका करतात की पंधराशे रूपयांत काय होणार? हा दुटप्पीपणा काय कामाचा? असा सवाल करत केंद्रीय राज्य मंत्री रक्षाताई खडसे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला.”

यावेळी पुढे बोलताना खडसे म्हणाल्या की, महायुती सरकारने माता भगिनींच्या आर्थिक उन्नती व स्वाभिमानासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. विरोधकांनी कितीही टीका करू द्या परंतू ही योजना कधीही बंद होणार नाही. आमदार प्रा.राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्जत-जामखेड मतदारसंघातील एक लाख लाडक्या बहिणींचे फार्म भरून झालेले आहेत. यातील बहूतांश बहिणींच्या खात्यावर योजनेचे पैसे प्राप्त झाले आहेत. कर्जत-जामखेडमध्ये या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे, असे म्हणत खडसे यांनी आमदार शिंदे यांच्या कामाचे कौतूक केले.त्याचबरोबर आगामी निवडणुकीत मतदारसंघातील सर्व महिलांनी आमदार शिंदे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहावे, असे अवाहन त्यांनी यावेळी केले.