Jamkhed Municipal Council election | जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला ; बहुसदस्यीय प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख)  Jamkhed Municipal Council election | जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असुन मुदती संपणाऱ्या नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यासंबंधीचे आदेश बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहेत. (Jamkhed Municipal Council election trumpet sounded; Election Commission orders drafting of multi-member ward structure)

शासनाने १ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या अध्यादेशान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नगरपरिषदामध्ये एकसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. असुन या निर्णयानुसार नवीन प्रभाग रचना होणार आहे.

बहुसदस्यीय प्रभाग रचनेत शक्यतोवर २ सदस्याचे प्रभाग करावयाचे आहेत. सर्व प्रभाग २ सदस्यांचे करणे शक्य नसेल तेथे एक प्रभाग ३ सदस्याचा असेल. सदर प्रभाग हा भौगोलिक परिस्थिती विचारात घेवून योग्य त्या ठिकाणी ठेवता येईल. मात्र जर अशी कोणतीही परिस्थिती नसल्यास सदर प्रभाग हा शेवटचा राहिल असे शासन आदेशात म्हटले आहे. प्रभाग रचनेसाठी  सन २०११ ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी केलेल्या आदेशात खालील बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

१) मुदती संपणाऱ्या नगरपरिषदांची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे.

२) नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये श्री विकास गवळी यांनी महाराष्ट्र शासनाविरुध्द दाखल केलेल्या रिट पिटीशन (सिव्हिल क्रमांक – ९८०/२०१९ मध्ये मा. न्यायालयाने दिनांक ०४/०३/२०२१ रोजी दिलेल्या निकालानुसार करावयाची कार्यवाही ही आरक्षणासंदर्भात असल्याने प्रारूप प्रभाग प्रसिध्दी च आरक्षण सोडत कार्यक्रमामध्ये त्याबाबतच्या सूचना देण्यात येतील. बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचनेवी कार्यवाही नव्याने सुरु करणे आवश्यक असल्याने १४ नगरपरिषदा व या पूर्वी आयोगाने वेळोवेळी दिलेल्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार करण्यात आलेली एक सदस्यीय प्रभाग रचना याद्वारे रद्द करण्यात येत आहे.

३) नगरपरिषद निवडणुकांकरिता बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात येत आहेत. सोबत जोडलेल्या परिशिष्टातील कार्यवाही करावयाच्या टप्प्यांचे कच्चा आरखडा करताना पालन होईल, याची दक्षता घ्यावी. सोबतच्या परिशिष्टांसह प्रभाग रचनेबाबत आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना मा. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग रचना नियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.

४) नगरपरिषदांच्या मागील सार्वत्रिक निवडणूकीनंतर अधिसूचनेन्वये हद्दीत झालेले बदल (क्षेत्र समाविष्ट करणे अथवा वगळणे), विकासाच्या योजनांमुळे झालेले भौगोलिक बदल उदा. नवीन रस्ते, पुल, इमारती इत्यादी विचारात घेण्यात यावे.

५) वरील परिस्थिती लक्षात घेता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे यासाठी सध्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरू करण्यात यावी. कच्चा आरखडा तयार होताच आयोगाला तात्काळ ई-मेलद्वारे त्वरित अवगत करावे, जेणेकरून पुढील कार्यवाही सुरू करता येईल. आयोगाच्या निदर्शनास आले आहे की, प्रभाग रचना करताना त्याची गोपनियता न राखणे, नियमांचे काटेकोर पालन न होणे, प्रारूप प्रभाग रचनेविरूध्द वाढणाऱ्या हरकतींची संख्या, अंतिम प्रभाग रचनेविरूध्द दाखल होणाऱ्या वाढत्या रिट याचिकांची संख्या व त्यामुळे उद्भवणारे न्यायालयीन प्रकरणे आणि या सर्वामुळे होणारा विलंब टाळणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येईल.

खाली नमूद केल्यानुसार कार्यवाही करून प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा  तयार केला जाणार आहे.

(१) गृहित धरावयाची लोकसंख्या: जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या २०११ च्या जनगणनेनुसार नगरपरिषद क्षेत्राची प्रगणक गटनिहाय एकूण लोकसंख्याअनुसूचित, जातीची व अनुसूचित जमातीची लोकसंख्या व प्रगणक गटाचे नकाशे जनगणना या लोकसंख्येच्या आधारावरच सदस्य संख्या कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावेत .व आरक्षणाची परिगणना करण्यात येईल

(२) वरील डाटावरून तयार केलेल्या kml फाईल्स (नकाशांच्या सॉफ्ट कॉपी)  मागील निवडणुकीच्या kml फाईल्स तयार केलेल्या असतील तर नकाशाप्रमाणे व्यवस्थित आहेत याची खात्री करावी. फाईल्स कशा तयार कराव्यात याबाबत मार्गदर्शक सूचना (ब-परिशिष्ट) व यूट्यूब लिंक https://youtu.be/nfRxH3dRuGk पाहून त्यानुसार तयार कराव्यात.

(३) कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, संगणक तज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी.

(४) प्रगणक गटांची मांडणी :- नगरपरिषदेच्या गुगल अर्थ अथवा तत्सम नकाशावर जनगणनेच्या प्रगणक गटांची मांडणी करण्यात यावी, अशी मांडणी करताना नगरपरिषदेचे कोणतेही क्षेत्र सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

(५) प्रभागांची संख्या ठरविणे:- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार नगरपरिषदेची एकूण सदस्य संख्या निश्चितकरावी. प्रत्येक नगरपरिषदेची लोकसंख्या व त्यानुसार नगरपरिषदेची सदस्य संख्या व त्यानुसार अनुज्ञेय असलेल्या २ सदस्यीय व ३ सदस्यीय प्रभागांची संख्या निश्चित करावी.

(६) प्रभागांची सरासरी लोकसंख्या प्रभाग रचना करताना नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या भागिले नगरपरिषदेची एकूण सदस्य संख्या गुणीले त्या प्रभागातील सदस्यांची संख्या या सूत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी. प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त या मर्यादेत प्रभागाची लोकसंख्या ठेवता येईल. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या किमान किंवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास त्याचे कारण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे आवश्यक राहील.

(७) ज्या नगरपरिषदेमध्ये तीन सदस्याचा एक प्रभाग होत आहे तो प्रभाग भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन योग्य त्या ठिकाणी ठेवता येईल. अशी कोणतीही परिस्थिती नसल्यास तो प्रभाग शेवटचा ठेवण्यात येईल. ज्या ठिकाणी असा प्रभाग शेवटचा ठेवण्यात आला नसेल, त्या ठिकाणी तो प्रभाग विशिष्ट ठिकाणी ठेवण्याबाबतचे स्पष्टीकरण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे आवश्यक राहील.

प्रभाग रचनेची दिशा

प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पध्दतीने द्यावेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी.

(८) प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सव्र्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे.

(९) प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्टया आटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरिता खालील बाबी विचारात घ्याव्यात.

(अ) प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

(ब) अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. नागरिकांचे प्रभागामधील दळणवळण विचारात घ्यावे.

(क)  नागरिकांचे दळणवळण शक्यतो लक्षात घ्यावे

(ड) प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्रे, दवाखाने, स्मशानभूमी, बाजारहाटाच्या जागा, पाणी पुरवठयाच्या तसेच जलनि:सारणाच्या सोयी सुविधा, इ. चा वापर ज्या नागरिकांकडून करण्यात येतो त्या नागरिकांचा समावेश असलेल्या प्रभागातच शक्यतोवर त्या सोयी सुविधा ठेवण्यात याव्यात.

(ई) प्रभागातील मुलांकरिता सर्वसाधारणपणे उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक शाळा, मैदाने, इ. शक्यतोवर त्याच प्रभागात ठेवण्यात याव्यात, इत्यादि.

(१०) प्रभाग रचना करताना प्रगणक गट शक्यतो फोडू नये. अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रभाग रचना करण्याकरिता प्रगणक गट फोडणे आवश्यक असेल व घरयादी उपलब्ध नसेल, तर त्या प्रकरणी सोबतच्या परिशिष्ट-ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्वेक्षण करून संबंधित क्षेत्रात लोकसंख्या कशाप्रकारे वितरित झाली आहे, हे निश्चित करावे. सर्वेक्षण करताना जनगणना ज्यावेळी झाली त्यावेळी म्हणजे २०११ मध्ये लोकसंख्येचे वितरण कसे होते, हे जाणून घ्यावयाचे असल्याने सर्वेक्षण करताना २०११ मध्ये जनगणनेच्यावेळी संबंधित व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहात होती किंवा कसे, संबंधित इमारत कधी बांधण्यात आली इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात.

(११) प्रत्येक प्रभागाच्या सीमारेषेचे वर्णन करताना उत्तर पूर्व, दक्षिण व पश्चिम अशा दिशा नमूद करून सीमारेषेचे वर्णन करावे. सीमारेषा नमूद करताना शहरातील सर्वसाधारण नागरिकाना प्रभागाची पूर्ण कल्पना येईल याची काळजी घ्यावी.

(१२) प्रभाग रचनेमध्ये प्रभागांना अनुक्रमांक देण्यात येतात. प्रभागाचे क्षेत्र चटकन लक्षात यावे याकरिता प्रभागांना अनुक्रमांकासोबत प्रभागाचे नाव देता येईल किंवा कसे है तपासावे. प्रभागांना नाव देणे हे बंधनकारक नाही. तथापि, जिल्हाधिकारी प्रभागांना नाव देण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. प्रभागांना नाव द्यावयाचे झाल्यास ते अशाप्रकारे देण्यात यावे जेणेकरुन सदर प्रभाग कोणत्या क्षेत्रातील आहे हे तात्काळ लक्षात येईल. उदा. त्या प्रभागातील प्रसिध्द असलेले महत्वाचे ठिकाण अथवा त्या प्रभागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले एखादे नगर अथवा वस्ती, इ.

(१३) प्रभाग रचनेचा नकाशा खालीलप्रमाणे तयार करावा

(1) गुगल अर्थचा नकाशा, या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात. प्रगणक गटांचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या दर्शवावी.

(ii) जनगणना प्रभागांच्या सीमा, निळया रंगाने दर्शवाव्यात.

(iii) नकाशावर शहरातील महत्वाची ठिकाणे, रस्ते, नद्या, नाले, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे दर्शवावे.

(iv) नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शविण्यात याव्यात.

(v) नकाशांचा आकार, नकाशावर दर्शविलेले प्रगणक गटांचे क्रमांक, लोकसंख्या, इत्यादी तपशील वाचता येईल या प्रमाणात असावा. नकाशे सुलभपणे हाताळता यावेत याकरिता आवश्यक असल्यास दोन किंवा तीन भागात तयार करावेत.

(vi) प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करावा, त्याच्या हद्दी स्पष्टपणे दर्शविण्यात याव्यात. त्या हद्दींवर असणारे रस्ते, नद्या, नाले, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे नकाशावर नमूद करावेत.

(vii) प्रत्येक प्रभागामध्ये समाविष्ट झालेले प्रगणक गट व नकाशानुसार त्या प्रभागामध्ये समाविष्ट होणारे प्रगणक गट एकच आहेत, याची खात्री करावी. तसेच जनगणनेकडून प्राप्त झालेली लोकसंख्येची आकडेवारी योग्यरित्या दर्शविण्यात आली आहे, याची खात्री करावी.

(१४) आयोगाचे निकष, अधिनियमातील व नियमातील तरतुदी, मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालयाने दिलेले निदेश विचारात घेऊन प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावा.

(१५) मागील अनेक निवडणुकांमध्ये आयोगाच्या निदर्शनास आले आहे की क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अनेकदा चुका होतात. राजकीय दबावाला बळी पडून अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली जाते. अशामुळे अलिकडच्या काळात अनेक रिट याचिका मा. उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभाग रचनेबाबत आदेश दिलेले आहेत. यामुळे सदर तयार केलेला कच्चा आराखडा कसा तयार करण्यात आला ? का तयार करण्यात आला? नियम व निकषांचे पालन झाले आहे का ? इत्यादी बाबी •आयोगाकडून तपासण्यात येतील. अशा तपासणीत आढळून आलेल्या मुद्दयांवर स्पष्टीकरण करणे व योग्य बदल करण्याची जबाबदारी उपरोक्त समितीची असेल.

(१६) वरील परिच्छेदानुसार कार्यवाही करून कच्चा आराखडा जतन करण्यात येईल व आरक्षण सोडतीच्या दिनांकापर्यंत त्याची गोपनीयता राखण्यात येईल. समितीव्यतिरिक्त इतर कोणालाही आराखड्याची माहिती दिली जाणार नाही.

(१७) आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार प्रारुप आराखड्यास राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देतील. प्रारुप आराखड्यामध्ये हद्दीचे वर्णन करणे, आरक्षण तक्ता तयार करणे, इत्यादी प्रक्रिया तयार करून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम व प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिध्दी करण्यात यावी.

 

web titel : Jamkhed Municipal Council election | Jamkhed Municipal Council election trumpet sounded; Election Commission orders drafting of multi-member ward structure