Nagpanchami 2023 : कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ जामखेडमध्ये रंगणार कुस्त्यांचा थरार, देशभरातील नामवंत मल्ल झुंजणार कुस्ती मैदानात !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Nagpanchami 2023: ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त जामखेड शहरात गेल्या 20 वर्षांपासून कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येत आहे. कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ हे मैदान भरवले जाते. यंदा मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 रोजी हे मैदान होणार आहे. या मैदानावर देशभरातील नामवंत मल्लांच्या झुंजी रंगणार आहेत. जामखेड तालुक्यातील कुस्ती शौकिनांनी या मैदानास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (Nageshwar Yatra Jamkhed)
नागपंचमी उत्सव व ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त जामखेड शहरात भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान भरवले जाते. यंदा या मैदानाचे 21 वे वर्ष आहे. या मैदानात आजवर देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावलेली आहे. नागपंचमीच्या काळात महाराष्ट्रात जे मोजके कुस्तीचे मैदानात होतात त्यात जामखेडचे मैदान सर्वात मोठे असते. या कुस्ती मैदानाचे आयोजन मराठा भाषिक संघ, मध्यप्रदेश चे अध्यक्ष युवराज (भाऊ) काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली व उप महाराष्ट्र केसरी बबन (काका) काशीद यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.
“राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व ह.भ.प. महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान, पिंपळवंडी) व प.पू. संत श्री.1008 महामंडलेश्वर दादोजी महाराज इंदोर यांच्या आशिर्वादाखाली हे मैदान पार पडणार आहे.”
या मैदानासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार, आमदार रोहित पवार, आमदार बाळासाहेब आजबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कुस्ती मैदानामध्ये जागतिक पोलीस आणि फायर गेम विजेते पै. विजय चौधरी (DYSP), पै. राहुल आवारे (DYSP), पै.नरसिंग यादव (DYSP) , पै. रोहित पटेल (हिंद केसरी) तसेच आशियाई कुस्ती स्पर्धेतील चॅम्पियन पै. सुजय तनपुरे यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. जामखेड तालुक्यातील कुस्ती शौकिनांनी या मैदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन आयोजन समिती व अजय (दादा) काशिद यांच्या वतीने करण्यात आले आहे.