जामखेड : जीवन समृद्ध करण्यासाठी संतांनी दाखवलेल्या मार्गावर चला – हभप ज्ञानेश्वरी महाराज बोराटे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Nagpanchami 2023 : “उत्सव केल्याने पाप जाते, देवाचे उत्सव आवर्जून करावेत. जामखेडला श्रीनागेश्वराचा उत्सव संपन्न होत आहे हे आपले सर्वांचे भाग्य आहे.आपले जीवन समृद्ध करण्यासाठी नामस्मरणाला महत्त्व दिले पाहिजे, संतांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहिले पाहिजे, असे ह.भ.प ज्ञानेश्वरी महाराज बोराटे यांनी कीर्तनातून सांगितले.” (Nageshwar Yatra Jamkhed)

nagpanchami 2023, Follow the path shown by the saints to enrich life - Habhap Dnyaneshwari Maharaj Borate, Nageshwar Yatra Jamkhed,

जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त श्री नागेश्वर पालखी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात १६ ऑगस्ट २०२३ रोजी झाली.बुधवारी ज्ञानेश्वरी महाराज बोराटे (Dnyaneshwari Maharaj Borate) यांची पहिली कीर्तन सेवा होती. या कीर्तनाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पहिल्याच दिवशी संपूर्ण मंडप भक्तांच्या उपस्थितीने भरला होता. आज सायंकाळी ह.भ.प. कैलास महाराज भोरे (Kailash Maharaj bhore) यांचे कीर्तन होईल.

nagpanchami 2023, Follow the path shown by the saints to enrich life - Habhap Dnyaneshwari Maharaj Borate, Nageshwar Yatra Jamkhed,

सदा नाम घोष करू हरि कथा!! जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर चिंतन करत असताना ‘ज्ञानेश्वरी’ महाराजांनी सामान्य जीवासाठी अनेक मोलाचे सल्ले दिले. त्या म्हणाल्या स्वतःचे वाढदिवस किंवा इतर वायफळ खर्च करण्यापेक्षा तो खर्च देवाच्या उत्सवाला खर्च केला पाहिजे. ज्यांच्यात सामर्थ्य आहे. शक्ती आहे. त्यांनी स्वतः पुढे येऊन देवाचे उत्सव साजरे केले पाहिजेत. जर तसे होत नसेल तर सर्वांनी एकत्र मिळून सार्वजनिक कार्यक्रम केला पाहिजे. श्री नागेश्वराचा गेल्या वीस वर्षांपासून भव्य धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. या उत्सवात मला कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजते. असे म्हणून त्यांनी सप्ताह समितीचे आणि ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले.

nagpanchami 2023, Follow the path shown by the saints to enrich life - Habhap Dnyaneshwari Maharaj Borate, Nageshwar Yatra Jamkhed,

आज गुरुवारी नंदकुमार वांडरे गुरुजी यांचे साडेचार ते साडेपाच वाजता प्रवचन होईल.सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प कैलास महाराज भोरे देवदैठण यांचे कीर्तन होईल. त्यानंतर पोपट नाना राळेभात यांची प्रसादाची पंगत होईल.

सप्ताहातील किर्तने

१६ ऑगस्ट ज्ञानेश्वरी महाराज बोराटे जामखेड
१७ ऑगस्ट कैलास महाराज भोरे देवदैठण
१८ ऑगस्ट हरी महाराज खुणे पाथरुड
१९ ऑगस्ट अजिनाथ महाराज निकम शेवगाव
२० ऑगस्ट अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले
२१ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
२२ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये,
२३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.

२१ ऑगस्ट २०२३ रोजी पालखी सोहळा

“सोमवारी २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.”