जामखेड : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमांतून आपल्या पाल्यांच्या कलागुणांचा अविष्कार पाहून पालकांना होणार आनंद खूप मोलाचा असतो, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल सातत्याने वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलने आयोजित केलेले वार्षिक स्नेहसंमेलन कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जामखेडचे गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी केले.
जामखेड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजक सौरभ शिंदे, आमदार प्रा राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डाॅ अल्ताफ शेख, कालिका पोदार लर्न स्कूलचे संचालक सागरशेठ अंदुरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचे संस्थापक प्रा कैलास माने, वर्षा कैलास माने,युवासेना तालुकाप्रमुख सुमित वराट, जाकीर शेख सर, जमीर सय्यद, अर्शद शेख, दयानंद कथले, देविदास भांदलकर, हसन तांबोळी, जुबेर शेख सह आदी उपस्थित होते.
यावेळी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला होता अश्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच काही माता पालकांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समुह नृत्ये सादर करत उपस्थितांची मने जिंकली. ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी घेत असलेली मेहनत या कार्यक्रमाच्या माध्यमांतून स्पष्ट दिसत होती. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून पालक भारावून गेले होते.
दरम्यान, यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक प्रा कैलास माने म्हणाले की, सध्या ज्या जागेत ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल सुरु आहे ती जागा शाळेसाठी अपुरी ठरत आहे, त्यामुळे संस्थेने भुतवडा रोड या भागातील निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त अशी नवी जागा खरेदी केली आहे. त्याठिकाणी लवकरच काम सुरु होणार आहे. ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वांच्या सहकार्यातून ही संस्था नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे, असेही यावेळी माने यांनी स्पष्ट केले.
यावेळी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या प्रि- प्रायमरी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध समुहनृत्ये सादर केले. विविध कार्यक्रम सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
सदर स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी स्कूलच्या प्राचार्या रिया आरोरा, शर्मिला लटपटे, सबिया सय्यद, तेहरिन पठाण, मलिका सय्यद, सुषमा जाधव,डोके सर, सुभाष फुलमाळी, अवधूत वासकर, सोनाली गाडेकर, राधा बांगर, सिमा शिरगिरे, दामिनी पाटील, झुबीन शेख, पिंपळे मॅडम, गौरी दळवी, आकांक्षा पाटील, उषा मिसाळ, आरती रोकडे, श्रध्दा राऊत, संगिता वासकर सह आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन विजय जाधव सर आणि पवार सर यांनी केले तर आभार अनिल डोके सर यांनी मानले.