जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आपण अत्याधुनिक युगात जगत जरी असलो तरी पोस्टाने येणाऱ्या पत्राची आपुलकी फोन कॉलने पूर्ण होणार नाही. ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता जनतेच्या भावना जपण्याचे काम पोस्टमन बांधवांकडून वर्षांनुवर्षांपासुन सुरु आहे. पोस्टमन बांधवांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे, अशी भावना पत्रकार किरण रेडे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त जामखेड येथील नागेश विद्यालयात तिकीट संग्रह कार्यशाळा व टपाल तिकीट प्रदर्शन घेण्यात आले तसेच जामखेड पोस्ट ऑफिसमध्ये उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार किरण रेडे यांच्या हस्ते जामखेड पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला
भारतीय डाक विभागाच्या वतीने 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2022 या काळात राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने जामखेड पोस्ट ऑफिसच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख,पत्रकार किरण रेडे,पोस्ट मास्टर बळी जायभाय, तांबे सर,महेश दांगट,अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे मा जिल्हाध्यक्ष गोरख राजगुरू,अविनाश ओतारी, जगदीश पेंलेवाढ,आनंद कात्रजकार, सुनील धस,संतोष औचरे,दादा धस,ईश्वर बोतत्रे,कालिदास कोल्हे,अखिलेश यादव,राजकुमार कुलकर्णी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोस्टमास्तर बळी जायभाय यांनी केले तर आभार अविनाश ओतारी यांनी मानले.