जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिक्षक म्हणजे ज्ञानाचा समुद्र, ज्ञानाचा आणि पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा,प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक, अपुर्णाला पुर्ण करणारा शिक्षक, शब्दांनी ज्ञान वाढवणारा शिक्षक, जगण्यातुन जीवन घडवणारा, तत्वातुन मुल्य फुलवणारा शिक्षक आशा या देवतुल्य शिक्षकांप्रती कृतज्ञता दर्शवणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन. जामखेड शहरातील कालिका पोदार लर्न स्कुलमध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
जामखेड येथील कालिका पोदार लर्न स्कुलमध्ये 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या दिवसभराचे कामकाज इयत्ता 9 वी मधील विद्यार्थ्यांनी पाहिले. नववीतील विद्यार्थी शिक्षक बनले होते.
कालिका पोदार लर्न स्कुलचे मुख्याध्यापक प्रशांत जोशी, शाळेचे संचालक सागर अंदुरे व निलेश तवटे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
तदनंतर विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध खेळांचे आयोजन केले. नाट्य, नृत्य, गायन सादर केले.या दिवशी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून संपुर्ण शालेय कामकाजाचा अनुभव घेतला. तसेच शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली.
अतिशय आनंदमयी वातावरणात कालिका पोदार लर्न स्कुलमध्ये शिक्षक दिन पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षक बनण्याचा अविस्मरणीय अनुभव घेतला.