जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत व जामखेड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून दोन्ही शहरात ‘सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प’ राबवला जाणार आहे. यासाठी 06 कोटी 37 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. (The city of Jamkhed and Karjat will have a “third” eye)
” Rohit Pawar has taken initiative for the security of Karjat and Jamkhed cities and ‘CCTV surveillance project’ will be implemented in both the cities. It is expected to cost 06 crore 37 lakh rupees. The project has recently received administrative approval, MLA Rohit Pawar told the media today.”
जामखेड व कर्जत या शहरांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी राबवल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाच्या माध्यमांतून दोन्ही शहरातील 49 ठिकाणी 120 सीसीटीव्ही कॅमेरे व 13 पब्लिक अॅड्रेस सिस्टीमची करडी नजर राहणार आहे. उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.या प्रकल्पामध्ये व्हिडीओ सर्व्हीलन्स सिस्टीम,पब्लिक अॅड्रेस सिस्टीम इत्यादींचा सामावेश असणार आहे.