जामखेड : दोन गटांतील वादाच्या बातमीने शासकीय यंत्रणांची पळापळ अन् जामखेड पोलिसांनी केली दंगा काबुची रंगीत तालीम
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मोटारसायकलचा धक्का लागल्यामुळे खर्डा चौकात दोन समाजाच्या गटांत तुफान वाद लागला आहे, अशी बातमी मिळताच सर्व शासकीय यंत्रणांची धावपळ सुरु झाली.. जामखेड पोलिसांचा मोठा ताफा तातडीने खर्डा चौकात दाखल झाला, अचानक रूग्णवाहिका अग्निशमन गाडी, पोलिसांची धावपळ वाढल्याने नागरिकही चक्रावून गेले होते. नेमकं कुठे काय घडलं ? याचा नागरिक कानोसा घेत होते. मात्र प्रत्यक्षात कुठे काहीच घडलं नव्हतं, खरं तर ती जामखेड पोलिसांची दंगा काबूची रंगीत तालीम होती. हे समजल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
आषाढी एकादशी व बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने जामखेडच्या खर्डा चौकात बुधवारी सायंकाळी दंगा काबूची रंगीत तालीम घेतली.2 गटात भांडणे चालू आहेत त्यामुळे 2 जातीत तेढ निर्माण झाला आहे. या घटनेला कसा प्रतिसाद दिला पाहिजे यासाठी जामखेड पोलिस स्टेशन व तालुका प्रशासन यांच्या वतीने दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व यंत्रणा सर्व प्रशासकीय अधिकारी सज्ज आहेत असे यातून दिसून आले. दंगा काबू योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सदर दंगा काबू योजने कामी 1 पोलीस निरीक्षक, 02 दुय्यम अधिकारी, 25 पोलीस अंमलदार, 2 होमगार्ड हजर होते.तसेच दंगा काबू योजना ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नंदकुमार गव्हाणे, अग्निशमन दल, फायर ब्रिगेड पथक उपस्थित होते.
सदर दंगा काबू रंगीत तालमीत पोलीस निरीक्षक महेश पाटील ,सपोनि सुनील बडे, पोसई अनिल भारती, सफो शिवाजी भोस, पोलीस हवालदार संजय लाटे, रमेश फुलमाली, पोलीस नाईक अविनाश ढेरे, ज्ञानदेव भागवत, अजय साठे, संतोष कोपणर, प्रकाश जाधव, ईश्वर परदेशी, प्रकाश मांडगे, देवीचंद पळसे, प्रवीण पालवे, देशमाने, देवढे, सुपेकर महिला पोलीस कॉन्स्टेबल दहिरे ,धनवडे सह आदी कर्मचारी सहभागी झाले होते.