IAS Kannan Gopinathan | प्रजेला नागरिक बनवणे हे माझे लक्ष्य : IAS कन्नन गोपीनाथन

जामखेड, दि. १६ सप्टेंबर | IAS kannan gopinathan speech in Jamkhed | नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता अधिकाऱ्यांना आणि सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारणे हा जनतेचा संवैधानिक अधिकार आहे. आपण आपल्याच सरकारला प्रश्न विचारणार नाही तर मग कुणाला विचारणार ? असा सवाल करत सध्या देशात मुळ प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे. मजबूत देश उभारणीसाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. पण दुर्दैवाने वेगळ्याच मुद्द्यांवर देशात चर्चा होते. हे रोखणे आवश्यक आहे असे मत आएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन (IAS kannan gopinathan) यांनी जामखेडमध्ये आयोजित व्याख्यानात मांडले.

युवक क्रांती दल (Yuvak kranti Dal) या संघटनेच्या वतीने १६ रोजी एका व्याख्यानाचे जामखेडमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) जामखेडमध्ये आले होते. ‘आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती’ या विषयावर कन्नन गोपीनाथन यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी, युक्रांदचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, अभिजीत मंगल, अॅड अरूण जाधव, लक्ष्मण घोलप, संयोजक म्हणून विशाल राऊत, अनिल घोगरदरे, विशाल नेमाने, विशाल रेडे, विजय घोलप हे उपस्थित होते.

पुढे बोलताना आयएएस कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) म्हणाले की,  देशात एवढी महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेल तेलाचे भाव खूप वाढले आहेत. लोकांनी धर्मांधता आणि धार्मिक धृवीकरणाच्या जाळ्यात न अडकता रोजगार आणि महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारायला हवेत.

कलम 370 च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारशी मतभेद झाल्यानंतर आएएस कन्नन गोपीनाथन यांनी जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन देशात खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून ते देशात चर्चेत आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन जनतेशी विशेषता: युवकांशी संवाद साधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

देश समजुन घेणं हे माझे लक्ष्य

देश समजुन घेणे हे माझे लक्ष आहे. जनतेचे प्रश्न समजुन घेण्याबरोबरच माझे प्रश्न जनतेसमोर मांडणे व संवादाची प्रक्रिया घडवणून यावर यावर मी सध्या काम करत आहे. मी निवडणूक लढवणार का ? मी संघटना सुरू करणार का? मी एनजीओ सुरू करणार का ? आण्णा अंदोलनासारखी चळवळ हाती घेणार का ? असं काही माझं ठरलेलं नाही. देश समजुन घेतोय पुढे काय होईल माहित नाही असेही कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) यावेळी बोलताना म्हणाले.

IAS kannan gopinathan
IAS kannan gopinathan speech in Jamkhed

२१ दिवसात कोरोना संपणार होता का?

कोविड १९ समस्या वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपाययोजना म्हणून संपूर्ण देश २१ दिवस बंद केला. मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. या निर्णयामुळे स्थलांतरित कामगार आपल्या घरी जाऊ शकत नव्हते. त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता. यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे गरजेचे होते. केंद्रसरकारने फक्त लॉकडाऊन केला, मात्र उपाययोजना केल्या नाहीत. सर्वांनी घराच्या बाल्कनीमध्ये येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात. या मोदींच्या आवाहनाची अडचण काही नव्हती. मुद्दा हा होता की, सर्वांच्या घरी बाल्कनी आहे का ? असा विचार करणे गरजेचे होते असे मत कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) यांनी व्यक्त केले.

स्थलांतरित कामगारांनी आपल्याच देशात लाठ्या-काठ्या खाल्ल्या

लॉकडाऊन काळात स्थलांतरित कामगार घरी जात असताना, पोलिसांनी त्यांना काठीने मारले. सरकारने त्यांना घरी जाण्याची कुठलीही सोय केली नव्हती. सर्व वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे ते पायी किंवा सायकलवर घरी चालले होते. तरीपण कामगारांनी स्वत:च्याच देशात काठीने मार खाल्ला. याचे कारण हे होते की, आपल्या देशात प्रजा आणि राजा यामध्ये खूप मोठं अंतर आहे. स्वातंत्र्य ही गोष्ट सामान्यांना अनुभवायला मिळत नाही. असे मत कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) यांनी व्यक्त केले.

मनरेगा योजनेने देशाला तारले

देशात एवढी महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेल तेलाचे भाव खूप वाढले आहेत. लोकांनी धर्मांधता आणि धार्मिक धृवीकरणाच्या जाळ्यात न अडकता सरकारला प्रश्न विचारावेत. असेही कन्नन गोपीनाथन म्हणाले. देशात एखाद्याला नोकरी मिळत नाही, असं असेल तर तो वैयक्तीक अडचण असेल. मात्र, देशात अनेकांना रोजगार मिळत नाही. असं असेल तर ती सरकारची जबाबदारी असून, बेरोजगारी वाढली आहे, असा याचा अर्थ होतो. एकेकाळी मनरेगा योजनेवर लोक टिका करायचे. आज मात्र हीच योजना नागरिकांना रोजगार देत आहे.

कन्नन गोपीनाथन कोण आहेत?

कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) यांचा जन्म १२ डिसंबर १९८५ साली केरळ (Kerala) राज्यात झाला. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण केरळमध्येच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी, झारखंड येथे पूर्ण केले. तिथं त्यांनी अभ्यासात सुवर्ण पदकही मिळविले. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी युपीएससी या परीक्षेचा अभ्यास केला व २०१२ साली ५९ वी रँक (59 Rank) मिळवून ते UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले.

त्यानंतर त्यांनी मिझोराम आणि दादरा नगर हवेली येथे जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळला. कलम 370 (Section 370) व अन्य मुद्यांवरून केंद्रसरकारच्या काही धोरणांवरून मतभेद झाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan resignation) यांनी राजीनामा दिला.आता ते देशभर व्याख्यानं देत फिरतात. सामाजीक कामात सक्रीय असतात तसेच विद्यार्थ्यांना आणि सामान्यांना मार्गदर्शन करतात.