जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पंचायत समिती निवडणूक 2022 साठी आज जामखेडच्या तहसील कार्यालयामध्ये गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे इच्छुकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत नुकतीच जामखेड तहसील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी नियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी भुसंपादन संदीप चव्हाण, जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी एका शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती संजय वराट, माजी सभापती गैतम उतेकर, माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले, भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, बाजीराव गोपाळघरे, शरद शिंदे, प्रशांत शिंदे, हनुमंत पाटील, अरुण वराट सर सह आदी उपस्थित होते.
जामखेड पंचायत समितीचे जाहिर आरक्षण खालील प्रमाणे
साकत गण – सर्वसाधारण
शिऊर गण – अनुसूचित जाती स्त्री
जवळा गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
अरणगाव गण – सर्वसाधारण
खर्डा गण – सर्वसाधारण
नान्नज गण – सर्वसाधारण स्त्री