पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जामखेड वाहतुक विभागाची दमदार कामगिरी, वर्षभरात केला 29 लाखांचा दंड वसुल !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड वाहतुक विभागाने सरत्या वर्षांत 5067 केसेस करत तब्बल 29 लाखांचा दंड वसुल करण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली. जामखेड वाहतुक विभागाच्या या कामगिरीमुळे राज्य शासनाच्या महसुलात भरीव वाढ झाली. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जामखेड वाहतुक विभागाने ही कारवाई पार पाडली.
जामखेड वाहतुक विभागाचे पोलिस नाईक अजय साठे, पोलिस काँस्टेबल अजिनाथ जाधव, पोलिस काँस्टेबल दिनेश गंगे, होमगार्ड रफिक तांबोळी यांच्या टीमने जामखेड शहरातील वाहतुक व्यवस्था व्हावी यासाठी सरत्या 2022 या वर्षांत मोठी मेहनत घेतली. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जामखेड वाहतुक विभागाने वर्षभर सतत कारवाया केल्या. जामखेड वाहतुक विभागाने 2022 या वर्षांत तब्बल 4996 ऑनलाईन केसेस करत तब्बल 28 लाख 49 हजार 100 रूपये इतका दंड वसुल केला, तर 71 कोर्ट केसेस करत तब्बल 49 हजार 850 रूपयांचा दंड वसुल केला.
जामखेड वाहतुक विभागाने सन 2022 या वर्षांत केलेल्या कारवाया अन् वसुल केलेला दंड खालील प्रमाणे
1) मालवाहतूक/ प्रवासी वाहतुक – 34 केसेस – 20 हजार (दंड)
2) नो पार्किंग – 3047 केसेस – 17 लाख 60 हजार 500 (दंड)
3) नंबर प्लेटवर चिन्ह असणे – 3 केसेस – 1500 रूपये (दंड)
4) ट्रिपल सीट – 153 केसेस – 1 लाख 53 हजार रूपये (दंड)
5) विदाऊट ड्रेस कोड – 4 केसेस – 3 हजार रूपये (दंड)
6) विदाऊट नंबर प्लेट – 1 केस – 500 रूपये (दंड)
7) विदाऊट इंंडिकेेटर – 1 केस – 500 रूपये (दंड)
8) मुदत संपलेले लायसन्स – 1 केस – 500 रूपये (दंड)
9) कॅबिनवर प्रवासी बसवणे – 55 केसेस- 27 हजार 500 रूपये (दंड)
10) ज्यादा प्रवासी – 2 केसेस- 2 हजार रूपये (दंड)
11) कागदपत्र न बाळगणे – 3 केसेस- 3 हजार 500 रूपये (दंड)
12) लायसन्स न बाळगणे – 330 केसेस- 1 लाख 70 हजार रूपये (दंड)
13) पीयुसी नसने – 40 केसेस- 20 हजार रूपये (दंड)
14) फॅन्सी नंबर प्लेट – 14 केसेस – 13 हजार रूपये (दंड)
15) लाऊड म्युझिक प्लेअर – 8 केसेस- 4 हजार रूपये (दंड)
16) नंबर प्लेटवर नाव असणे – 28 केसेस – 13 हजार 500 रूपये (दंड)
17) जनावरांची वाहतुक करणे – 42 केसेस – 25 हजार रूपये (दंड)
18) फ्रन्टशीट – 27 केसेस – 15 हजार 500 रूपये (दंड)
19) मोबाईलवर बोलणे – 58 केसेस- 68 हजार रूपये (दंड)
20) ईशारा करून वाहन न थांबवणे – 304 केसेस – 1 लाख 52 हजार रूपये (दंड)
21) विदाऊट हेल्मेट – 269 केसेस – 1 लाख 34 हजार रूपये (दंड)
22) ओव्हर स्पीड – 2 केसेस- 2 हजार दंड
23) काळी काच – 64 केसेस – 38 हजार रूपये (दंड)
24) समोर नंबर न दिसणे – 2 केसेस- 1000 रूपये दंड
25) धोकादायक मालाची वाहतुक – 39 केसेस – 30 हजार 500 रूपये दंड
26) नंबर प्लेटवर प्रेस / पोलिस नाव – 4 केसेस – 3 हजार रूपये दंड
27) फ्रंट नंबर नसने – 66 केसेस – 33 हजार दंड
28) रेड लॅम्प नसने – 2 केसेस – 2 हजार दंड
29) विदाऊट रिफलेक्टर – 13 केसेस – 13 हजार रूपये दंड
30) विदाऊट सिटबेल्ट – 346 केसेस- 66 हजार 600 रूपये दंड
31) विदाऊट इन्शुरन्स – 34 केसेस- 72 हजार दंड
कोर्ट केसेस खालील प्रमाणे
1) भा.द.वी 283 वाहतुकीस अडथळा – 35 केसेस – 7 हजार रूपये दंड
2) अवैध प्रवासी वाहतूक – 7 केसेस – 17 हजार 700 रूपये दंड
3) ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह – 17 केसेस – 16 हजार 900 रूपये दंड
4) भा.द.वी. 279 336 भरधाव वेग – 12 केसेस – 8 हजार 250 रूपये दंड
जामखेड वाहतुक विभागाने सन 2022 या वर्षांत जामखेड शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी मोठी मेहनत घेतली. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांविरोधात कारवाईचा कठोर दंडुका उगारला. तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधातही धडक कारवाई केली.चालू 2023 या वर्षांत सुध्दा जामखेड पोलिसांचा वाहतुक विभाग वाहतुक नियमांची अंमलबजावणी करताना कठोर कारवाई पार पाडताना दिसणार आहे.जामखेड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जामखेड वाहतुक विभागाचे कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीचे जनतेतून कौतूक होत आहे.