मोठी बातमी : आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्यातील खरिप पिकांना मिळणार जीवदान, कुकडीचे ओव्हर फ्लोचे आवर्तन सोडण्याचे आदेश, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे जनतेला पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सोडण्याची मागणी करताच पुण्याचे पालकमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तातडीने दखल घेत कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लोचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे कर्जत तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
कुकडी लाभक्षेत्रातील शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणी यावर्षी पाऊस कमी झालेला आहे. जूलै महिना उजाडत आला तरी या भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने काही गावांमध्ये टँकर सुरू आहेत.त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पर्जन्यमान कमी झाला असल्याने तातडीने कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लो चे आवर्तन सोडण्याची आवश्यकता आहे. कुकडीचे ओव्हर फ्लोचे आवर्तन तातडीने सोडल्यास या भागातील जनतेला मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. ही बाब आमदार प्रा राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. आवर्तन सोडण्याची मागणी केली.
यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या समवेत आमदार सुरेश धस, कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य काकासाहेब धांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, नितिन पाटील, महेश तनपुरे, अनिल गदादे, प्रविण फलके सह आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, २६ जूलै रोजी कुकडी प्रकल्पामध्ये ४२ टक्के पाणीसाठी होता तर २७ जूलै रोजी ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा कुकडी प्रकल्पामध्ये उपलब्ध झाला आहे. म्हणजे कुकडी प्रकल्पामध्ये दैनंदिन ५ द.ल.घ.फु. पाणी येवा (आवक) सुरू आहे. त्यामुळे दि. ३१ जुलै पूर्वी जर ३० टक्के पाणीसाठा झाला असेल तर ओव्हर फ्लो आवर्तन सोडता येते असा नियम व प्रघात आहे.
शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणी पाऊस कमी पडलेला आहे. काही गावांमध्ये टँकर सुरू आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पर्जन्यमान कमी झाला असल्याने तातडीने ओव्हर फ्लो आवर्तन डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर येडगाव धरण हे आज किंवा उद्या ओव्हर फ्लो होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे.तरी या मागणीचा व खालील भागाच्या पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न, खरिपातील पिकाचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणून ओव्हर फ्लो आवर्तन तातडीने सोडण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार प्रा.राम शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली होती.
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लो चे आवर्तन सोडण्याचे आदेश कुकडीचे मुख्य अभियंता, कुकडी यांना दिले आहेत. हे आवर्तन आज संध्याकाळपर्यंत पाणी सुटणार आहे. यामुळे पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी सुध्दा आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यात कुकडीचे तीन आवर्तन सोडण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे ज्या भागात मागील तीन वर्षांत कुकडीचे पाणी पोहचले नव्हते अश्या भागात सुध्दा पुर्ण दाबाने पाणी सोडण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. यंदा कर्जत-जामखेड मतदारसंघात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आमदार प्रा राम शिंदे हे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. कुकडीच्या डाव्या कालव्यातून ओव्हर फ्लो चे आवर्तन सोडण्यात येणार असल्याच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणी पाऊस कमी पडलेला आहे. काही गावांमध्ये टँकर सुरू आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे या भागांत तातडीने कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लो चे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले. या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन पुण्याचे पालकमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आवर्तन सोडण्याचे कुकडीच्या मुख्य अभियंत्यांना तात्काळ आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हे आवर्तन सुटणार आहे. या आवर्तनामुळे खरिप पिकांना मोठा दिलासा मिळण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या दुर होणार आहे.”