जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमदार प्रा राम शिंदे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 – संशोधन व विकास अंतर्गत सुचवलेल्या 11 रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत, असे आदेश ग्रामविकास विभागाने अधिक्षक अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, नाशिक यांना 31 मार्च रोजी दिले आहेत.
ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 साठी तयार करण्यात आलेल्या कोअर नेटवर्कमधील ग्रामीण रस्ते संशोधन आणि विकास या कामांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या योजनेतून कर्जत-जामखेड मतदारसंघातील 13 रस्त्यांची कामे व्हावीत अशी मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी 17 जानेवारी 2023 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
त्यानुसार अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नाशिक यांनी 13 पैकी 11 रस्त्यांचे प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर केले होते. या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत असे आदेश ग्रामविकास विभागाने 31 मार्च रोजी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नाशिक यांना दिले आहेत. या आदेशामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील 11 रस्त्यांसाठी सुमारे 15 कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.
कर्जत-जामखेडमधील खालील रस्त्यांचा समावेश
1) जामखेड – जातेगाव ते केदारेश्वर मंदिर रस्ता
2) जामखेड – सारोळा ते काटेवाडी रस्ता
3) जामखेड- धामणगाव ते जिल्हा हद्द
4) जामखेड- पिंपळगाव ते जगताप वस्ती
5) जामखेड – आपटी ते गव्हाणे वस्ती रस्ता
6) जामखेड – अरणगाव ते निगुडेवस्ती रस्ता
7) कर्जत- रवळगाव ते चिंतामणी मंदिर रस्ता
8) कर्जत – खांडवी ते टारमळवाडी ते आवळे वस्ती रस्ता
9) कर्जत – राशिन ते जिराफवस्ती रस्ता
10) कर्जत – निंबे ते डोंभाळवाडी रस्ता
11) कर्जत- सिध्देश्वर मंदिर भांबोरा ते जुना वाटलूज रस्ता