विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या टेम्पोवर छापा; डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने केला 34 लाखांचा मुद्देमाल जप्त | Raid on tempo in Karjat smuggling foreign liquor; 34 lakhs seized by DYSP Annasaheb Jadhav’s team
जामखेड टाईम्स वृत्तसेवा, 15 जानेवारी । कर्जत – श्रीगोंदा रस्त्यावरून विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर धाड टाकत सुमारे 370 दारूचे बाॅक्स व आयशर टेम्पोसह 34 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई DYSP आण्णासाहेब जाधव यांच्या टीमने शनिवारी पार पाडली. दारूचा एवढा मोठा साठा पोलिसांनी जप्त केल्याने कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Raid on tempo in Karjat smuggling foreign liquor; 34 lakhs seized by DYSP Annasaheb Jadhav’s team)
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत – श्रीगोंदा मार्गावरून विदेशी दारूची वाहतूक करणारा एक आयशर टॅम्पो येणार असल्याची गुप्त माहिती DYSP आण्णासाहेब जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे एक पथक शनिवारी या मार्गावर गस्त घालत होते. गस्त घालत असताना राक्षसवाडी शिवारात केसरी रंगाचा एक आयशर टेम्पो (एम एच१२क्यू डब्लू९६०८) पोलिसांना मिळून आला. (Raid on tempo in Karjat smuggling foreign liquor; 34 lakhs seized by DYSP Annasaheb Jadhav’s team)
यावेळी सदर टेम्पोची झडती घेतली असता त्यात दारूचा साठा मिळून आला. पकडलेला माल कोणाचा आहे ? असे गाडीचालकाला विचारले असता पारनेरच्या निघोजमधील प्रकाश शेळके यांच्या घरी घेऊन चाललो असल्याचे त्याने सांगितले. (Raid on tempo in Karjat smuggling foreign liquor; 34 lakhs seized by DYSP Annasaheb Jadhav’s team)
त्यानंतर कर्जत पोलिसांनी 370 विदेशी दारूचे बाॅक्स व आयशर टेम्पो असा 34 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गीताराम आनंदा लंके ( रा निघोज, ता पारनेर) यास ताब्यात घेतले.पोलिसांनी पकडलेल्या आयशर टेम्पोच्या मूळ नंबरची माहिती घेतली असता तो (एमएच. 16 सीडी. 3399) असल्याची माहिती समोर आली आहे. (Raid on tempo in Karjat smuggling foreign liquor; 34 lakhs seized by DYSP Annasaheb Jadhav’s team)
पोलिस काँस्टेबल सागर जंगम यांनी कर्जत पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. कलम ४२०, ३४ मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) (अ),८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस अंमलदार हृदय घोडके, सागर जंगम, संतोष साबळे, इरफान शेख आदींच्या पथकाने केली आहे.
सदर कारवाईतील दारूचा माल कोठून आणला जात होता व तो कोठे नेला जात होता.सदर वाहनाला चुकीचा क्रमांक टाकून दारूची चोरटी वाहतूक करीत होता.यात आणखी कितीजण सहभागी आहेत. याबाबत पूर्ण सखोल तपास करून अशा अवैध धंदे करणाऱ्यांचे पाळेमुळे उखडून टाकणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले.